सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून जागतिक स्तरावर ओळख असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे विद्यापीठ मुलभूत विज्ञान, आंतरविद्याशाखीय संशोधन व उपयोजित संशोधनातदेखील तेवढेच अव्वल आहे. या विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या विद्याशाखांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. १५ मे २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: सिंगापूरमध्ये असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे विद्यापीठ सिंगापूरमधील सर्वात मोठे स्वायत्त व शासकीय विद्यापीठ आहे. १९०५ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सिंगापूरमधील जुने विद्यापीठ तर आहेच त्याशिवाय आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रथितयश दोन रॅंकिंग सिस्टम्स म्हणजे क्यु...