जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
जपानमधील टोकियोस्थित ' युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ( युएनयू )' मध्ये २०१३ च्या पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . या विद्यापीठात Sustainability, Development and Peace या विषयांत एम . एस्सी . करण्यासाठी जपानमधील जपान फाउंडेशनकडून विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे . दोन वर्षे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात ' जागतिक स्थिरता , सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन , वैश्विक शांतता निर्माण , विकास आणि मानवाधिकार ' आदी आंतरशाखीय मुद्दे मुलभूत विज्ञान , सामाजिक विज्ञान व कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत पद्धतीने करायचे आहेत . पदवीमध्ये फक्त सैद्धांतिक (Theory based) अभ्यासावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो . प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया :- वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याबरोबरच टोफेल अथवा ...