सिंगापूरमध्ये दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती
सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व , पदवी व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक स्तरावरील शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या. पदवीपूर्व स्तरावरील शिष्यवृत्तीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना जीसीई-ए या पातळीच्या म्हणजेच ‘ सिंगापूर-केंब्रिज जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अॅडव्हान्स्ड ’ या किंवा तत्सम स्तरावरील दोन वर्षांचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. सिंगापूरच्या शैक्षणिक मंत्रालयाकडून दरवर्षी दहावी उत्तीर्ण भारतीय विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक अर्जदारांकडून १७ जुलै २०१६पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतरसांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व , पदवी व...