Posts

Showing posts with the label जर्मनी

जर्मनीमध्ये घ्या खगोलशास्त्राचे धडे!

मूलभूत संशोधनासाठी जगद्विख्यात असलेल्या जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्थेच्या एका सदस्य संशोधन संस्थेतील म्हणजेच मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी या संस्थेतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून ( The Galaxies and Cosmology Department) खगोलशास्त्र , पदार्थविज्ञान किंवा तत्सम विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून खगोलशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान सुरू होणाऱ्या या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी दि. १२ सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी:- जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्था जगातल्या मोजक्या नामांकित संस्थांपैकी एक असून मूलभूत संशोधनासाठी जगभर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. मॅक्स प्लँक संस्था फक्त जर्मनीतच नव्हे , तर संपूर्ण युरोपमध्ये कार्यरत असून संस्थेचे पहिले बिगरयुरोपीय केंद्र २००७ मध्ये फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या ज्युपिटर कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक आयामाला स्प...

जर्मनीमध्ये कर्करोग संशोधनासाठी पाठ्यवृत्ती

Image
जगातल्या बव्हंशी लोकसंख्येवर होणारा कर्करोगाचा वाढता प्रभाव पाहता, एक गोष्ट त्वरित ध्यानात येते की कर्करोगाशी संबंधित होणारे मुलभूत संशोधन तुलनेने खूपच अपुरे आहे. हे संशोधन फक्त संख्यात्मकच नव्हे तर दर्जात्मक दृष्टीनेही वाढावे आणि त्यातून कर्करोगाच्या अचूक उपचाराच्या अभिनव पद्धतींचा विकास व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था मुळातच खूप कमी आहेत. जर्मनीतील ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे त्यापैकी एक प्रतिष्ठित संशोधन केंद्र आहे. कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता आकर्षित करता यावी व त्यातून या युवा संशोधकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे या हेतूने नुकतीच पीएचडी पूर्ण केलेल्या अर्जदारांसाठी पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्ती कार्यक्रम संस्थेकडून राबवला जातो. यावर्षीच्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: जर्मनीमधील हेडलबर्ग शहरात असलेले ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर (DKFZ)’ हे जर्मनीचे राष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्र आहे. दरवर्षी जर्मनीमध्ये साडेचार लाखांपेक्षाही जास्त लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. प्रत्येक ...

जर्मनीमध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्ती

बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. बॉन विद्यापीठ हे मुलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, व्यवस्थापन आदी विषयांतील संशोधन व अध्यापन या दोहोंतही अव्वल आहे. या विद्यापीठाच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७ मधील पीएचडीच्या शिष्यवृत्तीसहित प्रवेशासाठी अर्थशास्त्र,पर्यावरणशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: जवळपास दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे सन १८१८ साली स्थापना झालेले बॉन विद्यापीठ हे जर्मनीतील प्राचीन व प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक महत्वाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण नोबेल पारितोषिक विजेते आहेत, तर इतर नावांमध्ये पोप बेनेडिक्ट, कार्ल मार्क्स, फ्रेड...

जर्मनीमध्ये कायद्यातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती

संशोधनासाठी जागतिक स्तरावर ओळख असलेली मॅक्स प्लांक या संस्थेच्या मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ या विभागाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कायद्यातील विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी अल्पकालीन शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कायद्याच्या विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी मॅक्स प्लांक सोसायटी पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १५ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने बनलेली आणि विज्ञान– तंत्रज्ञानातील संशोधनाच्या अत्त्युच्च दर्जाचे मानांकन म्हणून गणली जाणारी मॅक्स प्लांक संशोधन संस्था ही जर्मनीस्थित मॅक्स प्लांक सोसायटीच्या अनेक संस्थांपैकी एक आहे. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या एकूण ऐंशीपेक्षाही जास्त संस्था मॅक्स प्लांक सोसायटीच्या आहेत. या संस्था जर्मनी आणि युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक म्हणजे ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ’ ही कायद्याशी संबंधित विषयांत संशोधन करणारी संस्था आहे....