Posts

Showing posts with the label संशोधनासाठी शिष्यवृत्ती

संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या आरएमआयटी विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांमध्ये पीएचडी व पदव्युत्तर पदवी ग्रहण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या प्रथम सत्रातील पीएचडी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. ३१ ऑक्टोबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी :- ‘ रॉयल मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ’ ( आरएमआयटी) हे तांत्रिक विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील पहिल्या वीस नामांकित तर जगातल्या पहिल्या पाचशे विद्यापीठांपैकी एक आहे. १८८७ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ व्हिक्टोरिया राज्याच्या राजधानीत म्हणजे मेलबर्न या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठाची एकूण चार केंद्र आहेत तर आशिया , युरोप आदी खंडातील देशांमध्ये एकूण तीन केंद्र आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक , उपयोजित , किमान कौशल्यावर आधारित दृष्टिकोन जपलेला आहे. विद्यापीठाने जवळपास प्रत्येक विषयातील अभ्यासक्रमाचा आराखडा उद्योगक्षेत्रातील गरज ओ...

न्युझीलंडमध्ये पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

  न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून कोणत्याही विषयांतील  आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी संशोधन करता यावे यासाठी New Zealand International Doctoral Research Scholarships –NZIDRS हा पीएचडी कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय दि.१५ जुलै , २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत शिष्यवृत्तीबद्दल: विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेस आकर्षित करून त्या माध्यमातून न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून न्युझीलंडची अर्थव्यवस्था , आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना द्यायची या हेतूने न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम न्यूझीलंड शासनाच्या ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याची ट्युशन फी भरता येईल. तसेच , त्याला मिळणारा एकूण ...

जर्मनीमध्ये कायद्यातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती

संशोधनासाठी जागतिक स्तरावर ओळख असलेली मॅक्स प्लांक या संस्थेच्या मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ या विभागाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कायद्यातील विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी अल्पकालीन शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कायद्याच्या विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी मॅक्स प्लांक सोसायटी पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १५ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने बनलेली आणि विज्ञान– तंत्रज्ञानातील संशोधनाच्या अत्त्युच्च दर्जाचे मानांकन म्हणून गणली जाणारी मॅक्स प्लांक संशोधन संस्था ही जर्मनीस्थित मॅक्स प्लांक सोसायटीच्या अनेक संस्थांपैकी एक आहे. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या एकूण ऐंशीपेक्षाही जास्त संस्था मॅक्स प्लांक सोसायटीच्या आहेत. या संस्था जर्मनी आणि युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक म्हणजे ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ’ ही कायद्याशी संबंधित विषयांत संशोधन करणारी संस्था आहे....