Posts

Showing posts with the label लोकसत्ता

जर्मनीमध्ये घ्या खगोलशास्त्राचे धडे!

मूलभूत संशोधनासाठी जगद्विख्यात असलेल्या जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्थेच्या एका सदस्य संशोधन संस्थेतील म्हणजेच मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी या संस्थेतील आकाशगंगा आणि विश्वउत्पत्तीशास्त्र विभागाकडून ( The Galaxies and Cosmology Department) खगोलशास्त्र , पदार्थविज्ञान किंवा तत्सम विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून खगोलशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. १ ऑक्टोबर २०१६ ते जून २०१७ च्या दरम्यान सुरू होणाऱ्या या पीएचडी अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी दि. १२ सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज सादर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी:- जर्मनीमधील मॅक्स प्लँक संस्था जगातल्या मोजक्या नामांकित संस्थांपैकी एक असून मूलभूत संशोधनासाठी जगभर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते. मॅक्स प्लँक संस्था फक्त जर्मनीतच नव्हे , तर संपूर्ण युरोपमध्ये कार्यरत असून संस्थेचे पहिले बिगरयुरोपीय केंद्र २००७ मध्ये फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठाच्या ज्युपिटर कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रत्येक आयामाला स्प...

फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रम...

राज्यशास्त्रातील पी.एच.डी शिष्यवृत्ती

   पॅरिसमध्ये नव्यानेच सुरु केलेल्या ‘मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर’ (मॅक्स पो) या समाजशास्त्रातील संशोधन संस्थेकडून समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये पी.एच.डी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. या शिष्यवृत्तीसाठी त्यांच्याकडून दि. १५ मार्च २०१३ पूर्वी   अर्ज मागवण्यात आले आहेत.     पार्श्वभूमी :-  फ्रान्सची ‘सायन्सेस पो’ व जर्मनीमधील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ सोसायटीज’ या दोन शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या अग्रणी संस्थांनी एकत्र येऊन संयुक्तपणे २०१२ मध्ये एका नवीन संस्थेची म्हणजे ‘मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर’ची स्थापना केली. सर्वत्र ती मात्र ‘मॅक्स पो’ या नावाने परिचित आहे. फ्रान्स व जर्मनी या दोन देशांना समाजशास्त्रातील उत्कृष्ट संशोधनाची पार्श्वभूमी आहे. या दोन प्रमुख राष्ट्रांमधील समाजशास्त्रातील हे सहकार्य युरोपमधील मुलभूत संशोधन अजून विकसित होण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे. एकूणच, ‘मॅक्स पो’चे हे केन्द्र युरोपीय संशोधनासाठी मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे यात शंकाच नाही. गेल्या चाळीस वर्ष...

जागतिक बँकेची 'आर्थिक ' पदव्युत्तर शिष्यवृत्ती

  जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात.  जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते. त्यातील एक महत्वाची शिष्यवृत्ती म्हणजे 'जपान-जागतिक बँक संयुक्त शिष्यवृत्ती' (Joint Japan/World Bank Graduate Scholarship - JJWBGS ). शिष्यवृत्तीच्या नावावरूनच समजते की ती जपानच्या सहकार्याने दिली जाते. जागतिक बँकेचेी ही शिष्यवृत्ती आर्थिक विकासाशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शिष्यवृत्तीसाठी दि. ३१ मार्चपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.    पार्श्वभूमी :-  जागतिक बँकेच्या सदस्य देशांची संख्या साधारणत: १५० पेक्षाही जास्त आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये आर्थिक स्थैर्य नांदावे म्हणून त्या देशांमधील आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण विकासाशी संबंधित विषयांकडे जागतिक बँक विशेष लक्ष देत असते. विशेषत: यामुळेच अनेक विकसनशील देशांमध्ये जाग...

ब्रिटनमध्ये 'उद्योजकता' संशोधन शिष्यवृत्ती

व्यवस्थापनक्षेत्रातील शिक्षणात ब्रिटन आज जगात अग्रेसर आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. म्हणूनच भारतातून MBA किंवा व्यवस्थापनातील इतर पदव्या घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज अमेरिकेपेक्षा ब्रिटनमध्ये जास्त आहे.  अनुभवी व उत्तम दर्जाचा प्राध्यापकवर्ग, व्यवस्थापनाच्या अनेक क्षेत्रामध्ये चालणारे संशोधन, त्या संशोधनासाठी विद्यापीठातील अनेक रिसर्च सेंटर्सना असलेले औद्योगिक पाठबळ व सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा या गोष्टींमुळे आज ब्रिटनमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, इम्पिरियल, लंडन स्कूल ऑफ बिझनेस यांसारखी जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे आहेत. बाथ विद्यापीठ हे देखील याच नामावलीतील. संडे टाइम्सच्या अलीकडील अहवालानुसार बाथ विद्यापीठातील 'स्कूल ऑफ बिझनेस'ला ब्रिटनमधील प्रथम क्रमांकाचे तर तेथील व्यवस्थापन संशोधन केंद्र पाचव्या क्रमांकाचे म्हणून गौरवण्यात आले आहे. याच विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ मॅनेजमेंट'कडून ऑक्टोबर २०१३ ला सुरु होणाऱ्या पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  ...

जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

जपानमधील   टोकियोस्थित  ' युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ( युएनयू )' मध्ये २०१३ च्या   पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . या विद्यापीठात   Sustainability, Development and Peace या विषयांत एम . एस्सी . करण्यासाठी   जपानमधील जपान फाउंडेशनकडून   विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे . दोन वर्षे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात ' जागतिक स्थिरता , सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन , वैश्विक शांतता निर्माण , विकास आणि मानवाधिकार ' आदी आंतरशाखीय मुद्दे मुलभूत विज्ञान , सामाजिक विज्ञान व कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत   पद्धतीने   करायचे आहेत . पदवीमध्ये फक्त सैद्धांतिक (Theory based) अभ्यासावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो . प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया :- वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही   मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याबरोबरच   टोफेल अथवा ...