Posts

Showing posts with the label शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रम

फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रम...

ग्रीसमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

ग्रीस दूतावासाकडून विदेशी नागरिकांसाठी हेलेनिक (ग्रीक) शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सर्व विद्याशाखांसाठी पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असून या वर्षीच्या म्हणजे २०१३-१४ च्या शैक्षणिक प्रवेशासहित दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विदेशी नागरिकांकडून दुतावासाने दि . २६ जुलै २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्य वृत्तीबद्दल :- ग्रीस शासनाच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली   State Scholarship Foundation नावाची एक संस्था आहे, ज्याला ग्रीक भाषेत IKY असं म्हटलं जातं. IKY ची संबंधित शिष्यवृत्ती जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली असली तरी संस्थेने त्यासाठी अर्जदारांना दोन गटांमध्ये विभागले आहे. या गटांना संस्थेने टार्गेट १ व टार्गेट २ अशी नावे दिलेली आहेत. शिष्यवृत्तींची एकूण संख्या ३० असून त्यातील १५ शिष्यवृत्त्या टार्गेट १ गटाला म्हणजेच बाल्कन देश, पूर्वेकडील युरोपियन राष्ट्रे, आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका या खंडांमधील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत तर उर्वरित पंधरा शिष्यवृत्त्या युरोपियन युनियनची सदस्...