Posts

Showing posts with the label CGI Scholarship Program

थायलंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती

थायलंडमधील एक प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट हे रसायनशास्त्र , जीवशास्त्र व पर्यावरण या विद्याशाखांतील अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. संस्थेकडून हुशार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संबंधित विषयांतील पदव्युत्तर संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून ३० नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : - चुलाभोर्ण ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ( CGI) हे थायलंडमधील एक प्रमुख खासगी विद्यापीठ आहे. सीजीआय हे उपयोजित जैविक विज्ञान , जैवरसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्रांमधील आंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम हे जवळच असलेल्या चुलाभोर्ण संशोधन संस्थेच्या सहकार्याने राबवले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शास्त्रज्ञ असलेल्या थायलंडच्या राजघराण्यातील राजकन्या प्रा. डॉ. चुलाभोर्ण महिदोल यांच्या ४८व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रशस्त विद्यापीठाची स्थापना करण्या...