Posts

Showing posts with the label एमबीएसाठी शिष्यवृत्ती

सिंगापूरमध्ये एमबीएची संधी

व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील आशिया खंडातील जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणारी महत्त्वाची संस्था म्हणून सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नानयांग बिझनेस स्कूलला ओळखले जाते. एका नामांकित वृत्तपत्राच्या जागतिक क्रमवारीतील व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या तीस विद्यापीठांमध्ये , आशियातील तिसरे तर सिंगापूरमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून नानयांग बिझनेस स्कूलने स्थान पटकावले आहे. बिझनेस स्कूलकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीएसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी मार्चच्या अंतिम आठवडय़ापर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी:- सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ हे त्या देशातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही आशिया व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. नानयांग बिझनेस स्कूलकडून पदवी , पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात. या तिन्ही पदवी स्तरांवरील विविध अभ्यासक्रमा...

स्वित्झर्लंडमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती

व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD) चे नाव घ्यावे लागेल. संस्थेच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी : –   व्यवस्थापन क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD).   २०१२ पासून ते २०१५ पर्यंत दरवर्षी   ‘ फायनान्शियल टाइम्स ’ ने संस्थेच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे असल्याचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्स ,   बिझनेस वीक ,   वॉल स्ट्रीट जर्नल इत्यादी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षांत आयएमडीला जगातल्या प्रथम क्रमांकाचे...