Posts

Showing posts with the label फ्रान्स

फ्रान्समध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती

फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने व LERMIT ह्या आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था आणि युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, सॅक्ले  यांच्या सहकार्याने मेडिकेशन व थेराप्युटीक्स या शाखांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे व त्यासाठी तेवढ्याच तोडीचे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी या संस्थाच्या वतीने पीएचडीसाठी पाठ्यवृत्ती देण्यात येते.  मेडिकेशन व थेराप्युटीक्स शाखांबरोबरच जैवविज्ञान, रसायनशास्त्रज व भौतिकशास्त्र या विद्याशाखांमधील अर्जदारांना मेडिकेशन व थेराप्युटीक्समधील आंतरविद्याशाखीय संशोधन करता यावे, हासुद्धा या पाठ्यवृत्तीचा एक हेतू असतो. ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरु होणाऱ्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. १ एप्रिल २०१६   पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  पाठ्यवृत्तीबद्दल: डिसेंबर २००९ मध्ये फ्रान्स सरकारने भविष्यातही देशाचा विकास दर असाच राहावा म्हणून संशोधन व शिक्षणासाठी जवळपास २२ बिलीयन युरो एवढ्या रकमेची तरतूद केली. या कार्यक्रमांतर्गत सरकारने २०११ मध्ये एकूण १०० संशोधन प्रकल्पांची निवड केली व या संपूर्ण क...

फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्ती

फ्रान्समधील अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या खर्च सुसह्य व्हावा यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील या अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला असताना त्यांच्या निवास,भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा याबाबतीतील खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण सहजरीत्या व्हावे यासाठी फ्रान्स सरकारच्या परर...