Posts

Showing posts with the label सिंगापूर. आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून जागतिक स्तरावर ओळख असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे विद्यापीठ मुलभूत विज्ञान, आंतरविद्याशाखीय संशोधन व उपयोजित संशोधनातदेखील तेवढेच अव्वल आहे. या विद्यापीठाच्या एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या विभागाच्या वतीने वर उल्लेखलेल्या विविध क्षेत्रांमध्ये अद्ययावत संशोधन व्हावे म्हणून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एकात्मिक विज्ञाने व अभियांत्रिकी या  विद्याशाखांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारांकडून दि. १५ मे २०१६   पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: सिंगापूरमध्ये असलेले ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयुएस)’ हे  विद्यापीठ सिंगापूरमधील  सर्वात मोठे  स्वायत्त व शासकीय विद्यापीठ आहे. १९०५ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सिंगापूरमधील जुने विद्यापीठ तर आहेच त्याशिवाय आशिया खंडामधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रथितयश दोन रॅंकिंग सिस्टम्स म्हणजे क्यु...