Posts

Showing posts with the label Ph.D.

डेन्मार्कमध्ये पीएचडीचे धडे गिरवा!

डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठाकडून कला विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ     इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांने विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात ,   असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे ढोबळ स्वरूप आहे. कला शाखेतील कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या विद्यापीठाने २२ जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल :- कोपेनहेगन विद्यापीठ हे डेन्मार्कमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना १४७९ मध्ये झालेली आहे. पीएचडीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही पन्नास हजारांच्या घरात जाते. विद्यापीठाचे एकूण चार कॅम्पस आहेत. यातील प्रमुख कॅम्पस कोपेनहेगन शहरात आहे. विद्यापीठाचे बहुतांश अभ्यासक्रम हे डॅनिश भाषेत शिकवले जात असून काही अभ्यासक्रम हे इंग्रजी व जर्मन भाषेतही उपलब्ध आहेत. कोपेनहेगन विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या...

बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो .   पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे .   या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर   पदवीधर   अर्जदार अर्ज करू शकतो .   पात्र   अर्जदारांकडून   या शिष्यवृत्तीसाठी   दि .   १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे .   या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कुल्स् पैकी एक आहे .   लीड्स बिझनेस स्कूलकडून     पदवी ,   पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात .   या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे .   १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजा...

ब्रिटनमध्ये करा पीएचडी

कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी) या संस्थेकडून ब्रिटनमध्ये प्रत्येक विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम व पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ   इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांने सीएससीशी संलग्न विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी त्याला प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा सीएससीकडून दिल्या जातील , असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे ढोबळमानाने स्वरूप आहे. कोणत्याही विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१५ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: - कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी)कडून राबवला जाणारा कॉमनवेल्थ स्कॉलरशिप अँड फेलोशिप प्लॅन (सीएसएफपी) हा जगातल्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. १९५९ साली सीएसएफपी कार्यक्रम चालू झाल्यापासून जवळपास पस्तीस हजार अर्जदारांना ही शिष्यवृत्ती बहाल करण्यात आलेली आहे. विविध विषयांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करण्याच्या हेतूने हा शिष्य...

कॅनडामध्ये पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती

कॅनडामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या अल्बर्टा विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून पुढे त्या विषयांत पीएच.डी. करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी सेमिस्टरमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज सा दर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी :- कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा हे जगातल्या पहिल्या नामांकित शंभर तर देशातल्या पहिल्या पाच विद्यापीठांपैकी एक आहे. १९०८ मध्ये स्थापन झालेले हे शासकीय विद्यापीठ पश्चिम प्रांतातील अल्बर्टा राज्याच्या राजधानीत म्हणजे एडमंटन या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. एडमंटनमध्ये विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत , ज्यामध्ये दीडशे देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जवळपास चाळीस हजार विद्यार्थी वेगवेगळ्या एकूण चारशे विद्याशाखांमध्ये आपले शिक्षण घेत आहेत. एवढी मोठी विद्यार्थीसंख्या व तीन हजार प्राध्यापक वर्गासह असलेला एकूण पाच हजारांच्या घरात जाणारा विद्यापीठ...