नॉर्वेमध्ये व्यवस्थापन शिक्षण
नॉर्वेमधील बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल या प्रख्यात व्यवस्थापन विद्यापीठाकडून अर्थशास्त्र व व्यवस्थापनातील विविध विषयां मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्र मा चे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो . या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीधारकाला निशुल्क प्रवेश व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात. कोणत्याही विषयामध्ये पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१ मार्च २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल हे नॉर्वेतील अग्रगण्य तर युरोपातील द्वितीय क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जगातील प्रभाव पाडू शकणाऱ्या महत्वाच्या पस्तीस बिझनेस स्कुल्स्पैकी एक असा पुरस्कार बी आय ला मिळालेला आहे. राजधानी ओस्लोस्थित असलेल्या कँपससहित विद्यापीठाचे एकूण चार कँपस आहेत. विद्यापीठ अर्थशास्त्र व व्यवस्थापनाशी संबंधित विषयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल करते. संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमांपैकी जवळपास सर्व अभ्यासक्रम हे नॉर्वेजियन भाषेमध्ये चालतात तर सर्व पदव्युत्तर अ...