Posts

Showing posts with the label MBA

बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो .   पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे .   या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर   पदवीधर   अर्जदार अर्ज करू शकतो .   पात्र   अर्जदारांकडून   या शिष्यवृत्तीसाठी   दि .   १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे .   या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कुल्स् पैकी एक आहे .   लीड्स बिझनेस स्कूलकडून     पदवी ,   पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात .   या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे .   १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजा...

नॉर्वेमध्ये व्यवस्थापन शिक्षण

नॉर्वेमधील बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल या प्रख्यात व्यवस्थापन विद्यापीठाकडून अर्थशास्त्र व व्यवस्थापनातील विविध विषयां मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्र मा चे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो . या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीधारकाला निशुल्क प्रवेश व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात. कोणत्याही विषयामध्ये पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१ मार्च २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत .   शिष्यवृत्तीबद्दल : बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल हे नॉर्वेतील अग्रगण्य तर युरोपातील द्वितीय क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जगातील प्रभाव पाडू शकणाऱ्या महत्वाच्या पस्तीस बिझनेस स्कुल्स्पैकी एक असा पुरस्कार बी आय ला मिळालेला आहे. राजधानी ओस्लोस्थित असलेल्या कँपससहित विद्यापीठाचे एकूण चार कँपस आहेत. विद्यापीठ अर्थशास्त्र व व्यवस्थापनाशी संबंधित विषयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल करते. संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमांपैकी जवळपास सर्व अभ्यासक्रम हे नॉर्वेजियन भाषेमध्ये चालतात तर सर्व पदव्युत्तर अ...

स्वित्झर्लंडमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती

व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD) चे नाव घ्यावे लागेल. संस्थेच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी : –   व्यवस्थापन क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD).   २०१२ पासून ते २०१५ पर्यंत दरवर्षी   ‘ फायनान्शियल टाइम्स ’ ने संस्थेच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे असल्याचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्स ,   बिझनेस वीक ,   वॉल स्ट्रीट जर्नल इत्यादी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षांत आयएमडीला जगातल्या प्रथम क्रमांकाचे...