Posts

Showing posts with the label पाठय़वृत्ती

एमआयटीची पत्रकारिता पाठय़वृत्ती

जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता पाठय़वृत्ती अशी ओळख संपादन केलेली नाइट सायन्स पाठय़वृत्ती जागतिक दर्जाच्या एमआयटी विद्यापीठातर्फे दिली जाते. एमआयटी विद्यापीठ आणि जेम्स नाइट फाउंडेशनतर्फे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वैद्यक आदी विषयांत उत्कृष्ट पत्रकारिता करत असलेले जगभरातील पत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या पाठय़वृत्तीसाठी २०१६-१७ वर्षांकरता संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी : मानवी जीवनाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयांतील नवनवे संशोधन व तंत्रज्ञान पत्रकारितेद्वारे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे अशा हेतूने एमआयटी विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग व जेम्स नाइट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम’ १९८३ साली सुरू करण्यात आला. या पाठय़वृत्तीच्या माध्यमातून जगभरातील निवडक पत्रकारांना एमआयटी, हार्वर्ड, केंब्रिज व ग्रेटर बोस्टन यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळते. नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम हा एकूण नऊ मह...

आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती

अाशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या युवावर्गाला या समस्यांविषयक सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्यातील नेतृत्व कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने ‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ ही पाठय़वृत्ती दिली जाते. एकविसाव्या शतकात भारतासह इतर आशियाई देशांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणाऱ्या उमेदवारांकडून तसेच इतर क्षेत्रांतील अर्जदारांकडून या पाठय़वृत्तीसाठी १ डिसेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीबद्दल: कृतिशील व विकसनशील आशिया खंडाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या संस्थांपकी आशिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. १९५४ साली स्थापना झालेल्या या संस्थेने विविध शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व आणि संस्थात्मक विकास आणि धोरण संशोधन या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. ही संस्था गेली सहा दशके आशिया खंडातील देशांना भेडसावणाऱ्या कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य या गंभीर मुद्दय़ांवर कार्यरत आहे. आशिया फाऊंडेशनचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्...