उच्चशिक्षणासाठी अर्थसंधी
के.सी. महिंद्र फाउंडेशनकडून के.सी. महिंद्र शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एमएस, एमए, एमबीए किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवलेल्या अर्जदारास ही शिष्यवृत्ती दिली जाते. उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. मूलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- परदेशी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. यात मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी दिसतेय. पण परदेशात जाण्यासाठी पालकांना मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. साहजिकच एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती किंवा तत्सम आर्थिक मदत मिळाल्यास ते पालकांना हवेच असते. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून के.सी.महिंद्र फाउंडेशनकडून...