Posts

Showing posts with the label जपान

मेरी डिग्री है जापानी!

जपानमधील केओ विद्यापी ठाकडून ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन अँड गव्हर्नंन्स अॅकॅडमिक’ (GIGA) या कार्यक्रमांतर्गत प्रशासन कौशल्य,पर्यावरण अभ्यास आणि माहिती-तंत्रज्ञान या तिन्हींचा एकत्रित समावेश असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजेच  ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन एन्व्हायर्नमेंट अँड इन्फॉर्मेशन स्टडीज’ या पदवीचे शिक्षण घेऊ   इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याला प्रवेश व प्रवेश शुल्कासहित इतर सर्व सोयीसुविधा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांकडून या विद्यापी ठा ने  दि. १३ फेब्रुवारी २०१ ७ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : - केओ विद्यापीठ हे जपानमधील सर्वात जुने विदयापीठ आहे. टोकियोतील मिनॅटो या उपनगरात वसलेल्या या विद्यापीठाची स्थापना १८५८ साली झालेली असून विद्यापीठात साहित्य , अर्थशास्त्र , कायदा , व्यवसाय आणि वाणिज्य , वैद्यकशास्त्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान , धोरण व्यवस्थापन , पर्यावरण आणि माहिती अभ्यास , नर्सिंग व फार्मसी या सर्व विद्याशाखांतील पदवी ते पीएचड...

जपानमध्ये स्पेस सायन्समधील पाठ्यवृत्ती

अंतराळविज्ञानातील (Space Science) जागतिक स्तरावरील जपानस्थित दोन प्रख्यात संशोधन संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅण्ड अॅस्ट्रॉनॉटीकल सायन्सेस’ (ISAS) आणि ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) यांच्याकडून संयुक्तपणे जपानमध्ये अंतराळविज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. स्पेस सायन्समध्ये जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही पाठ्यवृत्ती ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’(ITYF) या नावाने ओळखली जाते. दोन्ही संस्थांनी २०१३ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:- २००९सालापासून ISAS आणि JAXA यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’ (ITYF)ही पाठ्यवृत्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जपानने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. विख्यात अशा दोन संशोधन संस्थांचे पाठबळ जरी ITYF ला असले तरी मुख्यत्वे ही पाठ्यवृत्ती ‘जपान एरोस्पेस ...

जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

जपानमधील   टोकियोस्थित  ' युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ( युएनयू )' मध्ये २०१३ च्या   पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . या विद्यापीठात   Sustainability, Development and Peace या विषयांत एम . एस्सी . करण्यासाठी   जपानमधील जपान फाउंडेशनकडून   विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे . दोन वर्षे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात ' जागतिक स्थिरता , सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन , वैश्विक शांतता निर्माण , विकास आणि मानवाधिकार ' आदी आंतरशाखीय मुद्दे मुलभूत विज्ञान , सामाजिक विज्ञान व कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत   पद्धतीने   करायचे आहेत . पदवीमध्ये फक्त सैद्धांतिक (Theory based) अभ्यासावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो . प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया :- वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही   मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याबरोबरच   टोफेल अथवा ...