Posts

Showing posts with the label कॅनडा

कॅनडामध्ये करा पीएच.डी.

कॅनडा सरकारकडून व्हेनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कॅनडातील कोणत्याही विद्यापीठामध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदाराला तीन वर्षांसाठी ती मिळू शकते. मूलभूत विज्ञान, कला शाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील पीएच.डी.च्या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखिलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून दि. २ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. आवश्यक अर्हता: ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला कॅनडामधील कोणत्याही एका विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पीएच.डी. करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशो...

कॅनडामध्ये पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती

कॅनडामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या अल्बर्टा विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून पुढे त्या विषयांत पीएच.डी. करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी सेमिस्टरमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज सा दर करायचा आहे. शिष्यवृत्तीविषयी :- कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा हे जगातल्या पहिल्या नामांकित शंभर तर देशातल्या पहिल्या पाच विद्यापीठांपैकी एक आहे. १९०८ मध्ये स्थापन झालेले हे शासकीय विद्यापीठ पश्चिम प्रांतातील अल्बर्टा राज्याच्या राजधानीत म्हणजे एडमंटन या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. एडमंटनमध्ये विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत , ज्यामध्ये दीडशे देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जवळपास चाळीस हजार विद्यार्थी वेगवेगळ्या एकूण चारशे विद्याशाखांमध्ये आपले शिक्षण घेत आहेत. एवढी मोठी विद्यार्थीसंख्या व तीन हजार प्राध्यापक वर्गासह असलेला एकूण पाच हजारांच्या घरात जाणारा विद्यापीठ...