इटलीमध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडी
इटलीमधील ‘ आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज ’ या संशोधन संस्थेने विविध विषयांची सांगड घालत आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील पीएचडी कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. पीएचडीसाठी प्रवेश , निशुल्क शिक्षण व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१३ जुलै २०१६ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : २०१६ च्या युरोपमधील विद्यापीठांच्या रँकिंग्जनुसार मध्य इटलीमधील लुक्का या शहरात असलेली ‘ आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज ’ ही संस्था संशोधनासाठी इटलीमध्ये प्रथम क्रमांकाची तर संपूर्ण युरोपात तृतीय क्रमांकाची म्हणून गणली गेलेली आहे. संस्थेच्या आद्याक्षरांतील आयएमटी म्हणजेच इन्स्टिट्यूशन्स , मार्केट्स , टेक्नोलॉजी. एकूणच संस्था शैक्षणिक-वैज्ञानिक , बाजारपेठ व तंत्रज्ञान या साऱ्यांचे एकत्रीकरण करू इच्छीत आहे व त्यातूनच विविध विषयांतील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करत आहे. म्हणूनच संस्थेने स्...