Posts

भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती

    भारतीय कलाकारांनी गुणात्मक व व्यावसायिक ध्येये गाठावीत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे हितसंबंध तयार व्हावेत या हेतूने दोन्ही देशांच्या पुढाकाराने कलाक्षेत्रासाठी उचललेलं एक पाऊल म्हणजे भारतीय कलाकारांसाठी ब्रिटनमध्ये दिली जाणारी ’सीडब्लूआयटी’ शिष्यवृत्ती. चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्टकडून ( CWIT ) दरवर्षी  दृश्यकला, नृत्य, संगीत, नाट्य, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेचे मूल्यमापन करता यावे यासाठी ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१५-१६ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित कला क्षेत्रांमधील अर्जदारांकडून दि. १५  नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   शिष्यवृत्ती बद्दल : सांस्कृतिक व भाषिक विविधता असणाऱ्या भारतासारख्या देशातील बहुविध कलेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ब्रिटनस्थित ‘ चार्ल्स  वॅलेस इंडिया ट्रस्ट’कडून ( CWIT ) दरवर्षी कला क्षेत्रांतील भारतीय कलाकारांना ब्रिटनमध्ये शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातील बहुसंख्य कलाकारांना करिअरच्या पहिल्या काही टप्प्...

नेदरलँड्समध्ये उच्चशिक्षणासाठी पाठ्यवृत्ती कार्यक्रम

     डच परराष्ट्र मंत्रालयाकडून विकसनशील देशांसाठी सहयोग विकास निधीच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ राबवला जातो. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम,पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यवृत्ती दिली जाते. २०१५  साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ४ नोव्हेंबर २०१४  पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   पाठ्यवृत्ती बद्दल :  ‘नेदरलँड्स पाठ्यवृत्ती कार्यक्रम’ ही संपूर्ण पाठ्यवृत्ती डच परराष्ट्र मंत्रालयाकडून’कडून दिली जाते. मंत्रालयाने  क्षमता व सहयोग विकास निधीच्या माध्यमातून सुमारे ५१ विकसनशील देशांच्या उच्चशिक्षणातील योगदानासाठी Netherlands Fellowship Programme -NFP  हाती घेतला व दरवर्षी तो यशस्वीपणे राबवला. या पाठ्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही डच विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयातील लघु अभ्यासक्रम, पदव्युत्तर आणि पी.एच.डी. अभ...

हार्वर्डमध्ये रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती कार्यक्रम

जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठातील ‘रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्सड् स्टडी’ हा विभाग विविध क्षेत्रांतील तज्ञ-विचारवंत, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, कलाकार किंवा लेखक इत्यादी सृजनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्तीद्वारे त्यांच्या या नवनिर्मितीत मोलाचे योगदान देऊ इच्छितो. म्हणूनच हार्वर्ड विद्यापीठाच्या या विभागाकडून उपरोक्त व्यावसायिकांनी त्यांच्या सबंधित विषयांतील प्रगत व अद्ययावत काम करावे यासाठी त्यांना रॅडक्लिफ पाठ्यवृत्ती बहाल केली जाते.  दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही पाठ्यवृत्ती संबंधित क्षेत्रात भरीव कार्य असणाऱ्या पात्र अर्जदारांना दिली जाणार आहे.  २०१५ साली दिल्या जाणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी विविध क्षेत्रातील व विविध विषयातील अर्जदारांकडून दि. १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: ‘रॅडक्लिफ आंतरराष्ट्रीय पाठ्यवृत्ती’ ही फक्त हार्वर्डच नव्हे तर जगभरात नाव कमवलेली पाठ्यवृत्ती आहे. कारण ही पाठ्यवृत्ती ‘हार्वर्ड’कडून दिली जाते व दुसरे म्हणजे सृजनशील क्षेत्रातलं किंवा एखादं नवनिर्मितीचं काम कर...

ऑस्ट्रेलियामधील ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’

तंत्रज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी ख्यातनाम असणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’कडून विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्च शिक्षणानंतर पुढे संबंधित विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती’ या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पी.एच.डी. करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संशोधनातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास (मास्टर्स बाय रिसर्च) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिली जाणार आहे. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि.२० ऑगस्ट२०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल रिसर्च स्कॉलरशिप’ ( यूटीएसआयआरएस )  या नावाने ओळखली जाणारी ही   शिष्यवृत्ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडने’कडून दिली जाते. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हे विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठाला ‘असोसिएशन ऑफ ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी नेटवर्क’ आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज’ या संस्थांकडून अतिशय उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे...

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?

खरंतर परदेशातील उच्चशिक्षण ही खूप अगोदरपासून नियोजनबद्ध करण्याची बाब आहे . आपल्याकडे परदेशात जाणारे सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेचे असतात . त्याखालोखाल वैद्यकीय , फार्मसी , व्यवस्थापन आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्ज करतात . यापैकी बहुतांश विद्यार्थी हे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (Masters) जाणारे असतात . हे विद्यार्थी भारतात असताना येथील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आता पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचे असा विचार सुरु करतात. इतर शाखांच्या तुलनेत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र परदेशातील उच्चशिक्षणाबाबतीत थोडी अधिक जागृती आहे. कदाचित म्हणून बरेचसे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असतानाच परदेशातील पुढच्या शिक्षणाची तयारी सुरु करतात. परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग तिथेच पीएचडीला अर्ज करायचा असाही बऱ्याचजणांचा विचार असतो . तो योग्यही आहे . त्यातही परदेशातील उच्चशिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेकडे असतो. मात्र, उच्चशिक्षणासाठी अमेरिकेबरोबरच युके आणि युरो...