Posts

परदेश शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा.

Image
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जीआरई , जीमॅट , सॅट , टोफेल किंवा आयइएलटीएस यांसारख्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याबद्दल थोडेसे. जीआरई (Graduate Records Exam)   – जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ( Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘ एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस ’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य , इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. मात्र , ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख विभाग आहेत. ...

जर्मनीमध्ये कायद्यातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती

संशोधनासाठी जागतिक स्तरावर ओळख असलेली मॅक्स प्लांक या संस्थेच्या मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ या विभागाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कायद्यातील विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी अल्पकालीन शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कायद्याच्या विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी मॅक्स प्लांक सोसायटी पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १५ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने बनलेली आणि विज्ञान– तंत्रज्ञानातील संशोधनाच्या अत्त्युच्च दर्जाचे मानांकन म्हणून गणली जाणारी मॅक्स प्लांक संशोधन संस्था ही जर्मनीस्थित मॅक्स प्लांक सोसायटीच्या अनेक संस्थांपैकी एक आहे. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या एकूण ऐंशीपेक्षाही जास्त संस्था मॅक्स प्लांक सोसायटीच्या आहेत. या संस्था जर्मनी आणि युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक म्हणजे ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ’ ही कायद्याशी संबंधित विषयांत संशोधन करणारी संस्था आहे....

ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियन सरकारकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘एन्डेव्हर पदव्युत्तर शिष्यवृत्ती’ दिली जाते. कोणत्याही विषयातील पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील पात्र अर्जदारांकडून दि. ३० जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: एन्डेव्हर शिष्यवृत्ती ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धात्मक शिष्यवृत्ती आहे. आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली असलेली ही शिष्यवृत्ती संपूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून, एखाद्या विषयाचा अभ्यास हाती घेऊन त्यामध्ये संशोधन करून स्वत:चा, स्वत:च्या देशाचा व ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक विकास साधता येईल अशा अर्जदाराला या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार सहकार्य करू इच्छित आहे. ‘एन्डेव्हर’सारख्या जागतिक दर्जाच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकार ऑस्ट्रेलियाचा शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा तयार करू पाहत आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलिया सरकार त्यांच्या देशातील उच्चशिक्षण आणि संशोधन क्षेत...

जर्मनीमध्ये पर्यावरणशास्त्रातील पीएचडीसाठी शिष्यवृत्ती

जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) या संस्थेकडून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात संशोधन करण्यासाठी बहुविद्याशाखीय पर्यावरण संशोधन कार्यक्रम राबवला आहे. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून दि. १५ जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:            ईशान्य जर्मनीमधील ओस्नाब्र्युक या शहरात असलेल्या जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) ही युरोप खंडातील पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संस्थांपैकी एक संशोधन संस्था आहे. १९९० साली स्थापना झालेल्या या संस्थेने म्हणूनच ‘पर्यावरणाचे अभिनव प्रकल्प राबवणारी संस्था’ अशी स्वत:ची ओळख बनवलेली आहे. स्थापनेपासून संस्थेने जवळपास ८८०० पर्यावरण प्रकल्पांना साधारणतः दीड बिलीयन युरोंचे आर्थिक सहकार्य केलेले आहे. सध्या संस्थेने पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संशोधन व पर्यावरण संरक्षणाला पूरक तंत्रज्ञानाचा विकास या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. संस्थेने संशोधन करण्या...

स्वित्झर्लंडमध्ये बायोमेडिकलमधील पीएचडी कार्यक्रम

स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च या संशोधन संस्थेने तिथल्याच बेसल विद्यापीठाच्या सहकार्याने बायोमेडिकल या विषयातील आंतरराष्ट्रीय पीएचडी कार्यक्रम राबवला आहे. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण चार वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या दोन्ही संस्थांनी दि. १ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:            जैवविज्ञान या मुलभूत विज्ञानाच्या शाखेतील जागतिक दर्जाची जी काही प्रमुख संशोधन केंद्रे आहेत त्यांमधील एक म्हणजे स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च. स्टेम सेल्स, न्युरोबायोलॉजी व कॅन्सर या विषयांमधील जागतिक स्तरावरच्या प्रगत संशोधनासाठी मायशर इन्स्टिट्यूटचे नाव घेतले जाते.          अलीकडेच म्हणजे १९७० साली स्थापन झालेल्या या संशोधन संस्थेतील संशोधन पूर्णपणे स्वतंत्र पण एकमेकांशी समन्वय असलेल्या वेगवेगळ्या बावीस विभागांमध्ये चालते. याव्...

दक्षिण कोरियात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संशोधन शिष्यवृत्ती

दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठाच्या ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टम लॅब’ या प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या या प्रयोगशाळेकडून पात्र विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएचडी (Integrated Masters and Ph.D. Program) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व संबंधित कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दि. ३० मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: चोसून विद्यापीठ हे दक्षिण कोरियातील एक प्रमुख खाजगी विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा परिसर कोरियाच्या नैऋत्येस असलेल्या ग्वांग्जू या महानगरामध्ये आहे. हे विद्यापीठ आशियामध्ये २५१ व्या क्रमांकाचे तर दक्षिण कोरियातील पहिल्या तीस विद्यापीठांपैकी एक आहे. चोसून विद्यापीठाचे ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या प्रगत तंत्रज्ञानातील संशोधन जागतिक ...

चीनमध्ये पदव्युत्तर शिष्यवृत्ती कार्यक्रम

आशिया खंडामधील देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत व आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातून उत्तम नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने चीनमधील झेजियांग विद्यापीठ या अग्रगण्य राष्ट्रीय विद्यापीठाने सार्वजनिक प्रशासन या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (Master in Public Administration: Asia Synergy Program for Future Leaders) आखलेला आहे. आशियातील इतर देशांच्या विद्यार्थ्यांनीही या अभ्यासक्रमात सहभाग दर्शवावा व आपल्या खंडासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांततेसाठी हातभार लावावा म्हणून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये रचला गेला असून त्यासाठी दोन वर्षे शिष्यवृत्तीधारकाला प्रवेशासहित संपूर्ण शिष्यवृत्ती व इतर सवलती दिल्या जाणार आहेत. २०१५ मधील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झेजियांग विद्यापीठाकडून आशियातील चीनव्यतिरिक्त इतर देशांमधील विद्यार्थ्यांकडून दि. १ जूनपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:          १८९७ मध्ये स्थापन झालेले झेजियांग विद्यापीठ हे चीनमधील एक प्रमुख राष्ट्रीय विद्यापीठ आहे. चीनमधील झेजियांग प्रांतातील हँग...