Posts

फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रम...

पर्यावरणातील पीएचडीसाठी नॉर्वेमध्ये पाठय़वृत्ती

नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या  जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विद्यापीठाकडून ८ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी:-   ऑस्लो विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ ऑस्लो) हे जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले नॉर्वेतील प्रख्यात व सर्वात मोठे विद्यापीठ आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील जगातल्या मोजक्या उत्कृष्ट केंद्रांपकी एक असलेले हे विद्यापीठ, विविध विद्याशाखांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधन समुदाय याकरता जगभरातील विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा आकर्षणबिंदू राहिले आहे. सुमारे २८ हजार विद्यार्थी व सात हजार कर्मचारी विद्यापीठाची व्यापकता संख्यात्मक पद्धतीनेही अधोरेखित करतात. विद्यापीठाच्या बायोसायन्सेस विभागापकी सेंटर ऑफ इकॉलॉजिकल अ‍ॅण्ड इव्हॉल्यूशनरी सिंथेसिस (CEES) या केंद्रामध्ये इकॉलॉजी या विषयातील रीसर्च फेल...

इटलीत ‘रिस्क मॅनेजमेंट’मधील शिष्यवृत्ती

इटलीमधील पिसा विद्यापीठाकडून रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश आणि एक वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एक वर्षांचा कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी शिष्यवृत्तीसहित प्रवेश जून व सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत देण्यात येतो. यावर्षीच्या सप्टेंबरमधील दुसऱ्या टप्प्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २५ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- इटलीमधील पिसा विद्यापीठाचे नाव गॅलेलिओमुळे सर्वश्रुत झाले. याशिवाय, इटलीतील अव्वल विद्यापीठ आणि जगातील प्राचीन अशा २० विद्यापीठांपकी एक म्हणून पिसा विद्यापीठाचा नावलौकिक सर्वत्र आहे. आजही हे विद्यापीठ विज्ञानासहित इतर विषयांतील उत्तम अध्ययनासाठी असलेली ओळख टिकवून आहे. पिसा विद्यापीठातील प्रमुख विभागांपकी एक म्हणजे वित्त विभाग. या वित्त विभागाने सध्या जगातला विमा क्षेत्रातील वाढता उद्योग लक्षात घेऊन त्यात शास्त्...

अमेरिकेत कला शाखेतील शिष्यवृत्ती

जागतिक स्तरावर कलाशाखा व सामाजिक शास्त्रांमधील गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कलाशाखा व समाजशास्त्रांचे संशोधन करणे आणि लेखन- संशोधनाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे व त्यातून या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाउंडेशन’कडून चालवली जाते. या विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठराविक आंतरराष्ट्रीय अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीला अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे. शिष्यवृत्तीबद्दल:- अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाउंडेशन’ या संस्थेने कला क्षेत्र व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकाराचाच एक भाग ...

मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम

मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील शिक्षण मेक्सिकोमधील विद्यापीठांमध्ये घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या   अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व शुल्क, मासिक वेतन व इतर संबंधित सुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून   दि. ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेली AMEXCID (T he Mexican Agency for International Development Cooperation ) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक,आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील परस्पर सहकार्य व त्यातून विकास या हेतूंनी कार्यरत असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये आदानप्रदान व्हावी व त्यातून सहकार्य वाढीस लागावे यासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध विषयांमधील आंतरर...

न्युझीलंडमध्ये पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

  न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून कोणत्याही विषयांतील  आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी संशोधन करता यावे यासाठी New Zealand International Doctoral Research Scholarships –NZIDRS हा पीएचडी कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय दि.१५ जुलै , २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत शिष्यवृत्तीबद्दल: विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेस आकर्षित करून त्या माध्यमातून न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून न्युझीलंडची अर्थव्यवस्था , आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना द्यायची या हेतूने न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम न्यूझीलंड शासनाच्या ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याची ट्युशन फी भरता येईल. तसेच , त्याला मिळणारा एकूण ...

परदेश शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा.

Image
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जीआरई , जीमॅट , सॅट , टोफेल किंवा आयइएलटीएस यांसारख्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याबद्दल थोडेसे. जीआरई (Graduate Records Exam)   – जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ( Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘ एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस ’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य , इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. मात्र , ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख विभाग आहेत. ...