Posts

Showing posts from January, 2014

न्यूझीलंडमध्ये संशोधनासाठी डॉक्टरल शिष्यवृत्ती

न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘एज्यूकेशन न्यूझीलंड’कडून सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पुढे संशोधन करता यावे यासाठी एक संशोधन कार्यक्रम राबवला जातो. न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम (New Zealand International Doctoral Research Scholarships -NZIDRS) हे त्याचं नाव. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून (न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व फिजी या तीन देशांमधील अर्जदारांव्यतिरिक्त) दि.१५ जुलै, २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत शिष्यवृत्तीबद्दल: विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेस आकर्षित करून त्या माध्यमातून न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून न्युझीलंडची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना द्यायची या हेतूने न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘एज्यूकेशन न्यूझीलंड’कडून सर्व विद्याशाखांमधील