Posts

Showing posts from September, 2015

इटलीत ‘रिस्क मॅनेजमेंट’मधील शिष्यवृत्ती

इटलीमधील पिसा विद्यापीठाकडून रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश आणि एक वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एक वर्षांचा कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी शिष्यवृत्तीसहित प्रवेश जून व सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत देण्यात येतो. यावर्षीच्या सप्टेंबरमधील दुसऱ्या टप्प्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २५ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- इटलीमधील पिसा विद्यापीठाचे नाव गॅलेलिओमुळे सर्वश्रुत झाले. याशिवाय, इटलीतील अव्वल विद्यापीठ आणि जगातील प्राचीन अशा २० विद्यापीठांपकी एक म्हणून पिसा विद्यापीठाचा नावलौकिक सर्वत्र आहे. आजही हे विद्यापीठ विज्ञानासहित इतर विषयांतील उत्तम अध्ययनासाठी असलेली ओळख टिकवून आहे. पिसा विद्यापीठातील प्रमुख विभागांपकी एक म्हणजे वित्त विभाग. या वित्त विभागाने सध्या जगातला विमा क्षेत्रातील वाढता उद्योग लक्षात घेऊन त्यात शास्त्