Posts

Showing posts from April, 2015

जर्मनीमध्ये पर्यावरणशास्त्रातील पीएचडीसाठी शिष्यवृत्ती

जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) या संस्थेकडून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात संशोधन करण्यासाठी बहुविद्याशाखीय पर्यावरण संशोधन कार्यक्रम राबवला आहे. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून दि. १५ जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:            ईशान्य जर्मनीमधील ओस्नाब्र्युक या शहरात असलेल्या जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) ही युरोप खंडातील पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या संस्थांपैकी एक संशोधन संस्था आहे. १९९० साली स्थापना झालेल्या या संस्थेने म्हणूनच ‘पर्यावरणाचे अभिनव प्रकल्प राबवणारी संस्था’ अशी स्वत:ची ओळख बनवलेली आहे. स्थापनेपासून संस्थेने जवळपास ८८०० पर्यावरण प्रकल्पांना साधारणतः दीड बिलीयन युरोंचे आर्थिक सहकार्य केलेले आहे. सध्या संस्थेने पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संशोधन व पर्यावरण संरक्षणाला पूरक तंत्रज्ञानाचा विकास या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. संस्थेने संशोधन करण्यासाठी बहुविद्याशाखीय पर्यावरण

स्वित्झर्लंडमध्ये बायोमेडिकलमधील पीएचडी कार्यक्रम

स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च या संशोधन संस्थेने तिथल्याच बेसल विद्यापीठाच्या सहकार्याने बायोमेडिकल या विषयातील आंतरराष्ट्रीय पीएचडी कार्यक्रम राबवला आहे. पीएचडीसाठी प्रवेश व एकूण चार वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या दोन्ही संस्थांनी दि. १ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:            जैवविज्ञान या मुलभूत विज्ञानाच्या शाखेतील जागतिक दर्जाची जी काही प्रमुख संशोधन केंद्रे आहेत त्यांमधील एक म्हणजे स्वित्झर्लंडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल रिसर्च. स्टेम सेल्स, न्युरोबायोलॉजी व कॅन्सर या विषयांमधील जागतिक स्तरावरच्या प्रगत संशोधनासाठी मायशर इन्स्टिट्यूटचे नाव घेतले जाते.          अलीकडेच म्हणजे १९७० साली स्थापन झालेल्या या संशोधन संस्थेतील संशोधन पूर्णपणे स्वतंत्र पण एकमेकांशी समन्वय असलेल्या वेगवेगळ्या बावीस विभागांमध्ये चालते. याव्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सात तांत्रिक