Posts

Showing posts from March, 2015

दक्षिण कोरियात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संशोधन शिष्यवृत्ती

दक्षिण कोरियातील चोसून विद्यापीठाच्या ‘वायरलेस अँड कम्युनिकेशन सिस्टम लॅब’ या प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या या प्रयोगशाळेकडून पात्र विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एकात्मिक पदव्युत्तर-पीएचडी (Integrated Masters and Ph.D. Program) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व संबंधित कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी प्रयोगशाळेकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दि. ३० मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: चोसून विद्यापीठ हे दक्षिण कोरियातील एक प्रमुख खाजगी विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा परिसर कोरियाच्या नैऋत्येस असलेल्या ग्वांग्जू या महानगरामध्ये आहे. हे विद्यापीठ आशियामध्ये २५१ व्या क्रमांकाचे तर दक्षिण कोरियातील पहिल्या तीस विद्यापीठांपैकी एक आहे. चोसून विद्यापीठाचे ‘वायरलेस अँड मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम्स’ या प्रगत तंत्रज्ञानातील संशोधन जागतिक