Posts

Showing posts from October, 2013

नेदरलँड्समध्ये कायद्यातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

नेदरलँड्समधील प्रसिद्ध अॅमस्टरडॅम विद्यापीठाकडून (University of Amsterdam) ‘अॅमस्टरडॅम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ या नावाने कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१४-१५ साली सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी अॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या लॉं स्कूलमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी दि. १ एप्रिल, २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: ‘अॅमस्टरडॅम लॉं स्कूल’मध्ये युरोपीय आर्थिक क्षेत्राबाहेरच्या म्हणजेच युरोपबाहेरच्या कायदा क्षेत्रातील सर्वोत्तम जागतिक गुणवत्तेस आकर्षित करण्याचे स्वप्न तिथल्या प्राध्यापकवर्गाने समोर ठेवले व त्यातून ‘अॅमस्टरडॅम गुणवत्ता शिष्यवृत्ती’ (Amsterdam Merit Scholarship- AMS) हा उपक्रम सुरु झाला. ए.एम.एस.ची ही शिष्यवृत्ती ‘अॅमस्टरडॅम लॉं स्कूल’मध्ये कायद्याच्या कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमास (एल.एल.एम.) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला विद्यापीठाकडूनशिष्यवृत्तीचा मिळणारा एकूण वार्षिक भत्ता सहा हजार युरो ते बारा हजार युरो एवढा असून निवड झालेल्या अर्जदाराला त

हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी.साठी शिष्यवृत्ती

हॉंगकॉंगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) सन २००९ पासून दिल्या जाणाऱ्या ‘हॉंगकॉंग पी.एच.डी. शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हॉंगकॉंगमधील विविध विद्यापीठांमध्ये (संबंधित विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विषयांत) पी.एच.डी.साठी प्रवेश व शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी. करू इच्छिणाऱ्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २०१४- १५ साठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संशोधन अनुदान परिषदेकडून दि. २ डिसेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. पार्श्वभूमी:- आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला हॉंगकॉंगमध्ये आकर्षित करून घेण्यासाठी सन २००९ साली ‘हॉंगकॉंग पी.एच.डी. शिष्यवृत्ती योजना’हॉंगकॉंगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत विज्ञान शाखेतील मुलभूत विज्ञान, वैद्यकीय व अभियांत्रिकी- तंत्रज्ञान तसेच कलाशाखेतल्या कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हॉंगकॉंगमध्ये पी.एच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्या