Posts

Showing posts from November, 2015

स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

ग्लोबल अलायन्स ( Global Alliance for Public Relations and Communication  Management ) ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात  काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील युएसआय (University of Italian Switzerland ) या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारा प्राध्यापकवर्ग यासाठी ओळखले जाणारे युएसआय (University of Italian Switzerland ) हे आंतरराष्ट्रीय स्विस विद्य

फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्ती

फ्रान्समधील अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या खर्च सुसह्य व्हावा यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील या अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला असताना त्यांच्या निवास,भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा याबाबतीतील खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण सहजरीत्या व्हावे यासाठी फ्रान्स सरकारच्या परर

आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती

अाशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या युवावर्गाला या समस्यांविषयक सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्यातील नेतृत्व कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने ‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ ही पाठय़वृत्ती दिली जाते. एकविसाव्या शतकात भारतासह इतर आशियाई देशांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणाऱ्या उमेदवारांकडून तसेच इतर क्षेत्रांतील अर्जदारांकडून या पाठय़वृत्तीसाठी १ डिसेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीबद्दल: कृतिशील व विकसनशील आशिया खंडाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या संस्थांपकी आशिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. १९५४ साली स्थापना झालेल्या या संस्थेने विविध शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व आणि संस्थात्मक विकास आणि धोरण संशोधन या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. ही संस्था गेली सहा दशके आशिया खंडातील देशांना भेडसावणाऱ्या कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य या गंभीर मुद्दय़ांवर कार्यरत आहे. आशिया फाऊंडेशनचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे असून स