Posts

Showing posts from November, 2013

केंब्रिजमध्ये गणितातील रामानुजन शिष्यवृत्ती

केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये गणितात असामान्य संशोधन करून अल्पावधीतच जगभर प्रसिध्दी मिळवलेले थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांचे व ट्रिनीटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावाने फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केंब्रिजमध्ये गणितातील संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही शिष्यवृत्ती हुशार वगणितातील संशोधनाची प्रचंड आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याशिष्यवृत्तीसाठी केंब्रिज विद्यापीठाकडून दि. १५ जानेवारी, २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:        वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे व ट्रिनीटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देण्यात येते. मुलभूत गणित किंवा उपयोजित गणितात व्यापक संशोधन व्हावे या हेतूने भारतीय विद्यार्थ्यांना पी.एच.डी. पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.रामानुजन शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षाचा असून या कालावधीतच वि