Posts

Showing posts from January, 2015

आयपीसीसीची पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

२००७ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाल्याने चर्चेत आलेल्या आयपीसीसी (इंटर गव्हर्नमेंट पॅनेल फॉर क्लायमेट चेंज) या संस्थेने पारितोषिकाच्या निधीतून विकसनशील देशांतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला. आयपीसीसी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत या देशांमधील युवा शास्त्रज्ञांना विद्यापीठामध्ये अथवा संशोधन संस्थेत ठराविक विषयांत दोन वर्षे संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१५-१७ मध्ये दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील युवा संशोधक अर्जदारांकडून दि. १५ फेब्रुवारी २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: डिसेंबर २००७मध्ये आयपीसीसीला मानवनिर्मित हवामान बदलांच्या परिणामांवर राबवलेल्या उपायांसाठी शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले. यामुळे हवामान बदल आणि मानवी सुरक्षा यांचे महत्व अधोरेखित झाले. म्हणूनच पारितोषिकाच्या मिळालेल्या निधीमधून आयपीसीसीने या विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवण्यासाठी आणखी आर्थिक भागीदारीची गरज होती

इटलीमध्ये अर्थशास्त्रातील पीएचडीसाठी शिष्यवृत्ती’

आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासू प्राध्यापकवर्ग आणि संशोधनातील तज्ञ मार्गदर्शक यांनी सुसज्ज अशा सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज् आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठ या इटली व फ्रांसमधील दोन संस्थांच्या वतीने संयुक्तपणे अर्थशास्त्रामध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाहित संशोधन शिष्यवृत्ती दिली जात आहे. २०१५-१६ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर अर्जदारांकडून दि. ७ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीजचा अर्थशास्त्र विभाग नामांकित असून तो ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स’ नावाने ओळखला जातो. या विभागात अर्थशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधन होते. औद्योगिक व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये इथे जागतिक दर्जाचे संशोधन व संशोधन प्रशिक्षण होते. या विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम दर्जाचे मानांकन मिळालेले आहे. सेंट अॅना स्कूल ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज् आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठ या दोन्ही संस्थांकडून अर्थशास्त्रात यावर्षी एकूण चार संशोधन शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. शिष्यवृत्तीधारक