Posts

Showing posts from September, 2013

रशियात स्कॉलटेक विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती

मुलभूत व उपयोजित विज्ञानासहित माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील स्कॉलटेक विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी २०१४ साठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- स्कॉलटेक विद्यापीठ म्हणजेच ‘स्कॉलकोव्हो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ हे रशियातील एक नामांकित खाजगी विद्यापीठ आहे. स्कॉलटेकचे नाव दोन गोष्टींमुळे झाले, एक म्हणजे अमेरिकेतील ‘एमआयटी’ विद्यापीठाच्या सहकार्याने २०११ मध्ये सुरु करण्यात आलेले विद्यापीठ म्हणून व दुसरे म्हणजे उपयोजित संशोधन व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारे येथील वातावरण. हे विद्यापीठ राजधानी मास्कोजवळ असलेल्या स्कॉलकोव्हो या उपनगरात आहे. नव्या पिढ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलभूत व उपयोजित संशोधनासाठी तयार करणे व त्यातून उद्योजकतेसाठी प्रेरित करणे या हेतूने स्कॉलटेक काम करत आहे. एकविसाव्या शतकात एका नव्या वैज्ञानिक युगाची लहर तयार करणे ज्यातून रशिया व जग या दोहोंचा फायदा होऊन जगातील अनेक समस्यंवर तंत्रज्ञानावर आधारित सृजनशील उत्तरे शोधता यावी

फिनलंडमध्ये सीमो पाठ्यवृत्ती कार्यक्रम

फिनलॅण्डमधील द सेंटर फॉर इंटरनॅशनल मोबिलिटी (CIMOCIMO   CIMO ) या संस्थेकडून विविध विद्याशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वि द्या र्थ्यांसाठी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत  देण्यात येणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी  सर्व विद्याशाखांमधील  पात्र अर्जदारांकडून  अर्ज मागव ण्यात आले आहेत . या  पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची फिरती अंतिम मुदत ( rolling deadline ) आहे . पाठ्यवृत्तीबद्दल:- ‘ सीमो’चा हा पाठ्यवृत्ती कार्यक्रम संशोधनाची प्रचंड आवड असलेल्या सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय युवक- युवतींसाठी आहे. हा कार्यक्रम जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुला असला तरी रशिया, चीन, भारत, चिली, ब्राझिल या देशांतील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. पाठ्यवृत्तीचा एकूण कालावधी त्या विद्याशाखेवर किंवा संशोधन विषयांवर अवलंबून आहे. तरी साधारणतः हा कालावधी तीन महिन्यांपासून एक वर्षापर्यंत असू शकतो. संस्थेकडून या कालावधी दरम्यान निवड झालेल्या अर्जदाराला ९०० ते १२०० युरोंचा मासिक भत्ता देण्यात येईल. पदव्युत्तर किंवा पी.एच.डी.नंतरच्या पदवीचा (पोस्टडॉक्टरल स