Posts

Showing posts from September, 2016

संशोधनासाठी मिळवा शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या आरएमआयटी विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांमध्ये पीएचडी व पदव्युत्तर पदवी ग्रहण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या प्रथम सत्रातील पीएचडी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. ३१ ऑक्टोबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी :- ‘ रॉयल मेलबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ’ ( आरएमआयटी) हे तांत्रिक विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील पहिल्या वीस नामांकित तर जगातल्या पहिल्या पाचशे विद्यापीठांपैकी एक आहे. १८८७ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ व्हिक्टोरिया राज्याच्या राजधानीत म्हणजे मेलबर्न या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठाची एकूण चार केंद्र आहेत तर आशिया , युरोप आदी खंडातील देशांमध्ये एकूण तीन केंद्र आहेत. विद्यापीठाने तयार केलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिक , उपयोजित , किमान कौशल्यावर आधारित दृष्टिकोन जपलेला आहे. विद्यापीठाने जवळपास प्रत्येक विषयातील अभ्यासक्रमाचा आराखडा उद्योगक्षेत्रातील गरज ओ

समाजसेवेसाठी पाठय़वृत्ती

समाजात घडणाऱ्या विविध नकारात्मक घटना अनेकांच्या मनाला   एक प्रकारचे नराश्य देतात. पण काहीजण मात्र अशा घटना होऊ नयेत यासाठी विधायक काम करण्याची प्रेरणा यातून घेतात. या लोकांना बरेचदा मार्गदर्शनाचा किंवा आ í थक स्रोतांचा , राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा अभाव जाणवतो. ज्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळे येतात अथवा ते कार्य मर्यादित होते. सामाजिक बदलांशी स्वत:ला जोडून घेऊ पाहणाऱ्या अशा अनेकांना त्यांची भविष्यातील वाटचाल अखंड राहावी यासाठी शटलवर्थ फाउंडेशन एक वर्षांची पाठय़वृत्ती बहाल करत आहे. २०१७ च्या शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी :- दक्षिण आफ्रिकेतील शटलवर्थ फाउंडेशनची स्थापना २००१ साली द. आफ्रिकन उद्योजक मार्क शटलवर्थ यांनी केली. त्यांचा हेतू होता , आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी विधायक सामाजिक बदल करू इच्छिणाऱ्या चेंजमेकर्सना आ í थक पाठबळ मिळावे. ही आ í थक मदत या भविष्यातील परिवर्तनकारांना ‘ शटलवर्थ पाठय़वृत्ती कार्यक्रम ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या