Posts

Showing posts from February, 2016

एमआयटीची पत्रकारिता पाठय़वृत्ती

जगातील सर्वात प्रतिष्ठित पत्रकारिता पाठय़वृत्ती अशी ओळख संपादन केलेली नाइट सायन्स पाठय़वृत्ती जागतिक दर्जाच्या एमआयटी विद्यापीठातर्फे दिली जाते. एमआयटी विद्यापीठ आणि जेम्स नाइट फाउंडेशनतर्फे विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण व वैद्यक आदी विषयांत उत्कृष्ट पत्रकारिता करत असलेले जगभरातील पत्रकार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या पाठय़वृत्तीसाठी २०१६-१७ वर्षांकरता संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी : मानवी जीवनाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयांतील नवनवे संशोधन व तंत्रज्ञान पत्रकारितेद्वारे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे अशा हेतूने एमआयटी विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग व जेम्स नाइट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम’ १९८३ साली सुरू करण्यात आला. या पाठय़वृत्तीच्या माध्यमातून जगभरातील निवडक पत्रकारांना एमआयटी, हार्वर्ड, केंब्रिज व ग्रेटर बोस्टन यांसारख्या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळते. नाइट सायन्स पाठय़वृत्ती कार्यक्रम हा एकूण नऊ महिन्य

इटलीमध्ये ‘एमबीए’साठी शिष्यवृत्ती

इटलीमधील लुईस बिझनेस स्कूल हे जगभरातील नामांकित व्यवस्थापन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेच्या एमबीए आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशी अर्जदारांना प्रवेशासहित शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी पदवीधर अर्जदारांकडून ३० मार्च २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : रोमस्थित लुईस बिझनेस स्कूल हे इटलीमधील मातब्बर व्यवस्थापन संस्थांपैकी एक आहे. जाणकार प्राध्यापकवर्ग, सुमारे दोन हजार कंपन्यांशी जोडलं गेलेलं विद्यापीठाचं नेटवर्क आणि त्यामुळे शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना जगातल्या नामांकित कंपन्यांबरोबर काम करण्याची मिळणारी संधी या सगळ्या बाबींमुळे लुईस बिझनेस स्कूल हे देशोदेशींच्या विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या संस्थेच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. यात केवळ एमबीए अभ्यासक्रमांचे विविध स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील ‘एमबीए आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमा’साठी ही शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून दिली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आक