Posts

Showing posts from June, 2015

परदेश शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षा.

Image
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जीआरई , जीमॅट , सॅट , टोफेल किंवा आयइएलटीएस यांसारख्या ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याबद्दल थोडेसे. जीआरई (Graduate Records Exam)   – जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ( Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘ एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस ’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य , इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. मात्र , ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख विभाग आहेत.

जर्मनीमध्ये कायद्यातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती

संशोधनासाठी जागतिक स्तरावर ओळख असलेली मॅक्स प्लांक या संस्थेच्या मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ या विभागाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय अर्जदारांना कायद्यातील विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी अल्पकालीन शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या कायद्याच्या विविध विषयांमध्ये संशोधन करण्यासाठी मॅक्स प्लांक सोसायटी पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १५ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञांच्या योगदानाने बनलेली आणि विज्ञान– तंत्रज्ञानातील संशोधनाच्या अत्त्युच्च दर्जाचे मानांकन म्हणून गणली जाणारी मॅक्स प्लांक संशोधन संस्था ही जर्मनीस्थित मॅक्स प्लांक सोसायटीच्या अनेक संस्थांपैकी एक आहे. विविध विषयांत संशोधन करणाऱ्या एकूण ऐंशीपेक्षाही जास्त संस्था मॅक्स प्लांक सोसायटीच्या आहेत. या संस्था जर्मनी आणि युरोपमधील बऱ्याचशा देशांमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक म्हणजे ‘मॅक्स प्लांक सोसायटी फॉर कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ’ ही कायद्याशी संबंधित विषयांत संशोधन करणारी संस्था आहे.