Posts

Showing posts from 2015

कॅनडामध्ये पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिष्यवृत्ती

सैद्धांतिक पदार्थविज्ञानात जागतिक दर्जाच्या मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्थांपैकी एक म्हणजे कॅनडातील ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’. कॅनडातीलच वाटर्लु विद्यापीठाच्या सहकार्याने संस्थेकडून सैद्धांतिक पदार्थविज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. या विषयात संशोधन व उच्चशिक्षण करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी दोन्ही संस्थांकडून एकत्रितपणे शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१६ साली दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी पदार्थविज्ञान किंवा गणित विषयातील आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून दि. १ फेब्रुवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : ‘पेरिमीटर इन्स्टिट्यूट फॉर थिओरोटिकल फिजिक्स’ ही कॅनडातील वाटर्लु शहरात असलेली संशोधन संस्था आहे. पदार्थविज्ञानामध्ये गुणात्मक संशोधन करणाऱ्या जगातल्या ज्या काही मोजक्या स्वतंत्र संशोधन संस्था आहेत, त्यापैकी ही एक.  स्वत: अर्ध्यातच महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलेल्या, ब्लॅकबेरीचे संस्थापक उद्योजक माईक लझारीदीस यांनी १९९९ साली या संस्थेची स्थापना केली. सैद्धांतिक पदार्थविज्ञानात मुळातच जागतिक दर्जाचे संश

स्वित्झर्लंडमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

ग्लोबल अलायन्स ( Global Alliance for Public Relations and Communication  Management ) ही स्वित्झर्लंडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात  काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्झर्लंडमधील युएसआय (University of Italian Switzerland ) या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी ग्लोबल अलायन्सच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि. ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.  शिष्यवृत्तीबद्दल: आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणारा प्राध्यापकवर्ग यासाठी ओळखले जाणारे युएसआय (University of Italian Switzerland ) हे आंतरराष्ट्रीय स्विस विद्य

फ्रान्समध्ये आयफेल शिष्यवृत्ती

फ्रान्समधील अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या खर्च सुसह्य व्हावा यासाठी फ्रान्स सरकारच्या परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्रालयाकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयफेल शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील या अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून दि. ८ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मुलभूत विज्ञान व अर्थशास्त्रातील पीएचडीच्या अभ्यासक्रमासाठी फ्रान्समधील विविध विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला असताना त्यांच्या निवास,भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा याबाबतीतील खर्चाचा ताण त्यांच्यावर पडू नये आणि तेथील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण सहजरीत्या व्हावे यासाठी फ्रान्स सरकारच्या परर

आशिया फाऊंडेशनची पाठय़वृत्ती

अाशिया खंडातील देशांमध्ये असलेल्या विविध समस्यांवर काम करणाऱ्या युवावर्गाला या समस्यांविषयक सखोल ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्यांच्यातील नेतृत्व कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने ‘आशिया फाऊंडेशन विकास पाठय़वृत्ती’ ही पाठय़वृत्ती दिली जाते. एकविसाव्या शतकात भारतासह इतर आशियाई देशांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणाऱ्या उमेदवारांकडून तसेच इतर क्षेत्रांतील अर्जदारांकडून या पाठय़वृत्तीसाठी १ डिसेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीबद्दल: कृतिशील व विकसनशील आशिया खंडाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या संस्थांपकी आशिया फाऊंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे. १९५४ साली स्थापना झालेल्या या संस्थेने विविध शासकीय-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व आणि संस्थात्मक विकास आणि धोरण संशोधन या क्षेत्रांमध्ये भरीव काम केले आहे. ही संस्था गेली सहा दशके आशिया खंडातील देशांना भेडसावणाऱ्या कायदा-प्रशासन, आíथक विकास, महिला सबलीकरण, पर्यावरण आणि प्रादेशिक सहकार्य या गंभीर मुद्दय़ांवर कार्यरत आहे. आशिया फाऊंडेशनचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे असून स

फ्रान्समध्ये अंतराळ संशोधनातील पदव्युत्तर शिष्यवृत्ती

जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रमाशी संबंधित अन

पर्यावरणातील पीएचडीसाठी नॉर्वेमध्ये पाठय़वृत्ती

नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या  जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विद्यापीठाकडून ८ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. पाठय़वृत्तीविषयी:-   ऑस्लो विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ ऑस्लो) हे जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले नॉर्वेतील प्रख्यात व सर्वात मोठे विद्यापीठ आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील जगातल्या मोजक्या उत्कृष्ट केंद्रांपकी एक असलेले हे विद्यापीठ, विविध विद्याशाखांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधन समुदाय याकरता जगभरातील विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा आकर्षणबिंदू राहिले आहे. सुमारे २८ हजार विद्यार्थी व सात हजार कर्मचारी विद्यापीठाची व्यापकता संख्यात्मक पद्धतीनेही अधोरेखित करतात. विद्यापीठाच्या बायोसायन्सेस विभागापकी सेंटर ऑफ इकॉलॉजिकल अ‍ॅण्ड इव्हॉल्यूशनरी सिंथेसिस (CEES) या केंद्रामध्ये इकॉलॉजी या विषयातील रीसर्च फेलो हे पद र

इटलीत ‘रिस्क मॅनेजमेंट’मधील शिष्यवृत्ती

इटलीमधील पिसा विद्यापीठाकडून रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश आणि एक वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एक वर्षांचा कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी शिष्यवृत्तीसहित प्रवेश जून व सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत देण्यात येतो. यावर्षीच्या सप्टेंबरमधील दुसऱ्या टप्प्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २५ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- इटलीमधील पिसा विद्यापीठाचे नाव गॅलेलिओमुळे सर्वश्रुत झाले. याशिवाय, इटलीतील अव्वल विद्यापीठ आणि जगातील प्राचीन अशा २० विद्यापीठांपकी एक म्हणून पिसा विद्यापीठाचा नावलौकिक सर्वत्र आहे. आजही हे विद्यापीठ विज्ञानासहित इतर विषयांतील उत्तम अध्ययनासाठी असलेली ओळख टिकवून आहे. पिसा विद्यापीठातील प्रमुख विभागांपकी एक म्हणजे वित्त विभाग. या वित्त विभागाने सध्या जगातला विमा क्षेत्रातील वाढता उद्योग लक्षात घेऊन त्यात शास्त्

अमेरिकेत कला शाखेतील शिष्यवृत्ती

जागतिक स्तरावर कलाशाखा व सामाजिक शास्त्रांमधील गुणात्मक व अद्ययावत संशोधन करणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे अमेरिकेमधील गेटी संशोधन संस्था. कलाशाखा व समाजशास्त्रांचे संशोधन करणे आणि लेखन- संशोधनाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचणे व त्यातून या विद्याशाखांचे संवर्धन करणे या हेतूने प्रेरित असलेली ही संस्था लॉस एंजेलिसस्थित ‘द गेटी फाउंडेशन’कडून चालवली जाते. या विविध विद्याशाखांमधील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्तपणे व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक औपचारिकतेशिवाय मांडता याव्यात यासाठी दरवर्षी ठराविक आंतरराष्ट्रीय अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संबंधित विषयांतील अर्जदारांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. गेटी फाउंडेशनच्या या शिष्यवृत्तीला अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दि. १ ऑक्टोबर २०१५ आहे. शिष्यवृत्तीबद्दल:- अमेरिकेत लॉस एंजेलिसमधील ‘द गेटी फाउंडेशन’ या संस्थेने कला क्षेत्र व सामाजिक शास्त्रांशी संबंधित इतर शाखांमधील उत्कृष्ट दर्जाच्या संशोधनासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या पुढाकाराचाच एक भाग

मेक्सिकोमध्ये आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम

मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध विषयांमधील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या स्तरावरील शिक्षण मेक्सिकोमधील विद्यापीठांमध्ये घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या   अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व शुल्क, मासिक वेतन व इतर संबंधित सुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून   दि. ३१ ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेली AMEXCID (T he Mexican Agency for International Development Cooperation ) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक,आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील परस्पर सहकार्य व त्यातून विकास या हेतूंनी कार्यरत असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. अलीकडेच म्हणजे सप्टेंबर २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये आदानप्रदान व्हावी व त्यातून सहकार्य वाढीस लागावे यासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध विषयांमधील आंतरराष्ट्रीय