Posts

Showing posts from March, 2013

डॉक्टर्ससाठी मॉलिक्युलर मेडिसिनमध्ये पी.एच. डी.

जर्मनीमधील प्रख्यात हॅन्नोवर मेडिकल स्कूलमध्ये “ बायोमेडिकल रिसर्च" विभागामार्फत मॉलिक्युलर मेडिसिन या विषयात पी.एच.डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी जीवशास्त्र वा   वैद्यकीय क्षेत्रांतील उच्च पदवीधरांकडून दि.१ एप्रिल   २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत .   पार्श्वभूमी :-   हॅन्नोवर मेडिकल स्कूलकडून दिली जाणारी पी.एच.डी.पदवी जर्मनीमधील तीन नामांकित वैद्यकीय संशोधन संस्था अनुक्रमे लेबनित्झ युनिव्हर्सिटी ऑफ हॅन्नोवर , द युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसीन , हॅन्नोवर आणि हेल्मोल्टझ् सेंटर ऑफ इन्फेक्शन रिसर्च या सर्वांच्या सहकार्याने दिली जाते. या डॉक्टरल   अभ्यासक्रमासाठी पूर्वी DAAD अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जायची. आता मात्र , ‘ German Excellence Initiative’ कार्यक्रमांतर्गत या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संबंधित पी.एच.डी. जरी मॉलिक्युलर   मेडिसिनमध्ये असली तरी संशोधनाचे उपविषय बव्हंशी व्यापक आहेत. पी ’ एच.डी. अभ्यासक्रमाच्या संशोधनाची पातळी अतिशय उच्च असून हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रांतील युरोपियन मानकांनुसार मुल्यांकित केलेला आहे. शिष्यवृत्तीब

राज्यशास्त्रातील पी.एच.डी शिष्यवृत्ती

   पॅरिसमध्ये नव्यानेच सुरु केलेल्या ‘मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर’ (मॅक्स पो) या समाजशास्त्रातील संशोधन संस्थेकडून समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमध्ये पी.एच.डी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. या शिष्यवृत्तीसाठी त्यांच्याकडून दि. १५ मार्च २०१३ पूर्वी   अर्ज मागवण्यात आले आहेत.     पार्श्वभूमी :-  फ्रान्सची ‘सायन्सेस पो’ व जर्मनीमधील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ सोसायटीज’ या दोन शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या अग्रणी संस्थांनी एकत्र येऊन संयुक्तपणे २०१२ मध्ये एका नवीन संस्थेची म्हणजे ‘मॅक्स प्लँक सायन्सेस पो सेंटर’ची स्थापना केली. सर्वत्र ती मात्र ‘मॅक्स पो’ या नावाने परिचित आहे. फ्रान्स व जर्मनी या दोन देशांना समाजशास्त्रातील उत्कृष्ट संशोधनाची पार्श्वभूमी आहे. या दोन प्रमुख राष्ट्रांमधील समाजशास्त्रातील हे सहकार्य युरोपमधील मुलभूत संशोधन अजून विकसित होण्यासाठी नक्कीच गरजेचे आहे. एकूणच, ‘मॅक्स पो’चे हे केन्द्र युरोपीय संशोधनासाठी मोलाचे योगदान देणारे ठरणार आहे यात शंकाच नाही. गेल्या चाळीस वर्षांत पाश्च्यात्त जगतात खाजगीकर