Posts

Showing posts from January, 2016

ऑक्सफर्डमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या उद्योग-व्यवस्थापन विभागात उपलब्ध असलेल्या एमबीए (१+१) अभ्यासक्रमासाठी पìशग स्क्वेअर फाऊंडेशनकडून हुशार आणि नेतृत्वगुण असलेल्या विदेशी अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून १८ मार्च २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी.. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ अशी ओळख असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन प्राप्त झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची ख्याती सर्वश्रुत आहेच. अद्ययावत उद्योग- व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात उपलब्ध आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व वेगवेगळे विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या विद्यापीठाचा व्यवसाय विभाग सद बिझनेस स्कूल या नावाने ओळखला जातो. सौदी उद्योजक सद वाफिक यांच्या निधीतून हा विभाग १९९६ साली विद्यापीठात सुरू करण्यात आला. या विभागाच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या एकूण अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर अभ्