Posts

Showing posts from December, 2016

बिझनेस स्कूलमध्ये पीएचडीची संधी

लीड्स विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलकडून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयाशी संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो .   पीएचडीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे .   या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर   पदवीधर   अर्जदार अर्ज करू शकतो .   पात्र   अर्जदारांकडून   या शिष्यवृत्तीसाठी   दि .   १ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशायरमधील लीड्स शहरात वसलेले लीड्स विद्यापीठ हे युरोपमधील एक प्रमुख विद्यापीठ आहे .   या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही युरोप व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कुल्स् पैकी एक आहे .   लीड्स बिझनेस स्कूलकडून     पदवी ,   पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात .   या विभागाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जगातल्या नामांकित १०० अभ्यासक्रमांपैकी एक आहे .   १९९७ साली स्थापना झालेल्या या विभागामध्ये सर्व अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थी आहेत .   तब्बल ऐंशीपेक्षाही जास्त वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या आंत

ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी

जगद्विख्यात   ऑक्सफर्ड विद्यापीठा तील सर्व विद्याशाखांच्या   पदव्युत्तर विभा गां कडून   पदव्युत्तर   अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी   विकसनशील देशांमधील   हुशार व उत्तम   शैक्षणिक पार्श्वभूमी   असलेल्या   अर्जदारांना   या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासहित   शिष्यवृत्ती दिली जाते .   २०१७ -१८   साठी दिल्या जाणाऱ्या या   प्रवेश व   शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून दि .   ६ जानेवारी २०१७   पूर्वी अर्ज   मागवण्यात आले आहेत . शिष्यवृत्तीबद्दल : जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार     आहे व त्यामुळेच आजमितीस होणाऱ्या या खाद्य उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन विकसनशील देशांतून वाढीस लागावे व त्यातून भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या खाद्य आवश्यकतांची पूर्तता व्हावी या हेतूने लुईस द्रेफस फाउंडेशन गेली अनेक वर्षे सातत्याने विकसनशील देशांमधील कृषी व अन्न सुरक्षा या विषयांवर काम करत आहे. फाउंडेशनकडून या व अशा अनेक समस्यांचा वेध घेत असतानाच फक्त कृषी व अन्न सुरक्षाच नव्हे तर     आरोग्य , पर्यावरण , जल व्यवस्थापन , अ

नॉर्वेमध्ये व्यवस्थापन शिक्षण

नॉर्वेमधील बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल या प्रख्यात व्यवस्थापन विद्यापीठाकडून अर्थशास्त्र व व्यवस्थापनातील विविध विषयां मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्र मा चे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो . या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीधारकाला निशुल्क प्रवेश व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात. कोणत्याही विषयामध्ये पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१ मार्च २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत .   शिष्यवृत्तीबद्दल : बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल हे नॉर्वेतील अग्रगण्य तर युरोपातील द्वितीय क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जगातील प्रभाव पाडू शकणाऱ्या महत्वाच्या पस्तीस बिझनेस स्कुल्स्पैकी एक असा पुरस्कार बी आय ला मिळालेला आहे. राजधानी ओस्लोस्थित असलेल्या कँपससहित विद्यापीठाचे एकूण चार कँपस आहेत. विद्यापीठ अर्थशास्त्र व व्यवस्थापनाशी संबंधित विषयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल करते. संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमांपैकी जवळपास सर्व अभ्यासक्रम हे नॉर्वेजियन भाषेमध्ये चालतात तर सर्व पदव्युत्तर अभ्या