Posts

Showing posts from July, 2013

जपानमध्ये स्पेस सायन्समधील पाठ्यवृत्ती

अंतराळविज्ञानातील (Space Science) जागतिक स्तरावरील जपानस्थित दोन प्रख्यात संशोधन संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅण्ड अॅस्ट्रॉनॉटीकल सायन्सेस’ (ISAS) आणि ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (JAXA) यांच्याकडून संयुक्तपणे जपानमध्ये अंतराळविज्ञानातील विविध विद्याशाखांमध्ये उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. स्पेस सायन्समध्ये जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही पाठ्यवृत्ती ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’(ITYF) या नावाने ओळखली जाते. दोन्ही संस्थांनी २०१३ साठी देण्यात येणाऱ्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल:- २००९सालापासून ISAS आणि JAXA यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘इंटरनॅशनल टॉप यंग फेलोशिप’ (ITYF)ही पाठ्यवृत्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जपानने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे असे म्हणावे लागेल. विख्यात अशा दोन संशोधन संस्थांचे पाठबळ जरी ITYF ला असले तरी मुख्यत्वे ही पाठ्यवृत्ती ‘जपान एरोस्पेस

ग्रीसमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

ग्रीस दूतावासाकडून विदेशी नागरिकांसाठी हेलेनिक (ग्रीक) शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सर्व विद्याशाखांसाठी पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असून या वर्षीच्या म्हणजे २०१३-१४ च्या शैक्षणिक प्रवेशासहित दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विदेशी नागरिकांकडून दुतावासाने दि . २६ जुलै २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्य वृत्तीबद्दल :- ग्रीस शासनाच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली   State Scholarship Foundation नावाची एक संस्था आहे, ज्याला ग्रीक भाषेत IKY असं म्हटलं जातं. IKY ची संबंधित शिष्यवृत्ती जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली असली तरी संस्थेने त्यासाठी अर्जदारांना दोन गटांमध्ये विभागले आहे. या गटांना संस्थेने टार्गेट १ व टार्गेट २ अशी नावे दिलेली आहेत. शिष्यवृत्तींची एकूण संख्या ३० असून त्यातील १५ शिष्यवृत्त्या टार्गेट १ गटाला म्हणजेच बाल्कन देश, पूर्वेकडील युरोपियन राष्ट्रे, आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका या खंडांमधील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत तर उर्वरित पंधरा शिष्यवृत्त्या युरोपियन युनियनची सदस्य रा

ऑस्ट्रेलियामध्ये मरीन इंजिनिअरिंगसाठी शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियामधील ‘ द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी ( SUT)’ ही संस्था मरीन सायन्स , ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजी च्या ऑस्ट्रेलियामधील विविध शाखांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना  गेली अनेक वर्षे शिष्यवृत्ती देते.  दरवर्षीप्रमाणे SUT कडून या वर्षीही मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यावर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी संस्थेकडून दि.१   ऑगस्ट २०१३ पूर्वी   अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्य वृत्तीबद्दल:-     ऑस्ट्रेलियामधील ‘ द सोसायटी फॉर अंडरवॉटर टेक्नॉलॉजी ( SUT)’ ही संस्था मरीन सायन्स , ऑफशोअर इंजिनिअरिंग आणि अंडरवॉटर टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उत्तमपणे काम करत आहे. संबंधित क्षेत्रांमध्ये काम करत असतानाच शैक्षणिक क्षेत्रासाठी काहीतरी योगदान द्यावे म्हणून संस्थेने एज्युकेशनल सपोर्ट फंड नावाचा एक निधी संस्थेने तयार केला. संबंधित शिष्यवृत्ती या निधीमधूनच दरवर्षी मरीन सायन्समधील विद्यार्थ्यांना देण्यात येते. SUT ’ ची ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. शिष्य वृत्तीचा कालावधी एक वर्षाचा असून