Posts

Showing posts from February, 2013

जागतिक बँकेची 'आर्थिक ' पदव्युत्तर शिष्यवृत्ती

  जागतिक बँकेकडून सदस्य असलेल्या विकसनशील राष्ट्रांमधील अर्जदारांना वेगळ्या विषयांवरील अभ्यासक्रम अथवा प्रकल्पांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात.  जागतिक बँक जवळपास या सर्वच शिष्यवृत्त्या एखाद्या इतर सहकारी देशाच्या मदतीने देत असते. त्यातील एक महत्वाची शिष्यवृत्ती म्हणजे 'जपान-जागतिक बँक संयुक्त शिष्यवृत्ती' (Joint Japan/World Bank Graduate Scholarship - JJWBGS ). शिष्यवृत्तीच्या नावावरूनच समजते की ती जपानच्या सहकार्याने दिली जाते. जागतिक बँकेचेी ही शिष्यवृत्ती आर्थिक विकासाशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या शिष्यवृत्तीसाठी दि. ३१ मार्चपूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.    पार्श्वभूमी :-  जागतिक बँकेच्या सदस्य देशांची संख्या साधारणत: १५० पेक्षाही जास्त आहे. जगातील सर्व विकसनशील देशांमध्ये आर्थिक स्थैर्य नांदावे म्हणून त्या देशांमधील आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण विकासाशी संबंधित विषयांकडे जागतिक बँक विशेष लक्ष देत असते. विशेषत: यामुळेच अनेक विकसनशील देशांमध्ये जागतिक बँकेकडून बरेचसे कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांतर्

ब्रिटनमध्ये 'उद्योजकता' संशोधन शिष्यवृत्ती

व्यवस्थापनक्षेत्रातील शिक्षणात ब्रिटन आज जगात अग्रेसर आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. म्हणूनच भारतातून MBA किंवा व्यवस्थापनातील इतर पदव्या घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज अमेरिकेपेक्षा ब्रिटनमध्ये जास्त आहे.  अनुभवी व उत्तम दर्जाचा प्राध्यापकवर्ग, व्यवस्थापनाच्या अनेक क्षेत्रामध्ये चालणारे संशोधन, त्या संशोधनासाठी विद्यापीठातील अनेक रिसर्च सेंटर्सना असलेले औद्योगिक पाठबळ व सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा या गोष्टींमुळे आज ब्रिटनमध्ये केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, इम्पिरियल, लंडन स्कूल ऑफ बिझनेस यांसारखी जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे आहेत. बाथ विद्यापीठ हे देखील याच नामावलीतील. संडे टाइम्सच्या अलीकडील अहवालानुसार बाथ विद्यापीठातील 'स्कूल ऑफ बिझनेस'ला ब्रिटनमधील प्रथम क्रमांकाचे तर तेथील व्यवस्थापन संशोधन केंद्र पाचव्या क्रमांकाचे म्हणून गौरवण्यात आले आहे. याच विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ मॅनेजमेंट'कडून ऑक्टोबर २०१३ ला सुरु होणाऱ्या पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.