Posts

Showing posts from February, 2017

सिंगापूरमध्ये एमबीएची संधी

व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील आशिया खंडातील जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणारी महत्त्वाची संस्था म्हणून सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नानयांग बिझनेस स्कूलला ओळखले जाते. एका नामांकित वृत्तपत्राच्या जागतिक क्रमवारीतील व्यवस्थापन अभ्यासक्रमांमध्ये पहिल्या तीस विद्यापीठांमध्ये , आशियातील तिसरे तर सिंगापूरमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून नानयांग बिझनेस स्कूलने स्थान पटकावले आहे. बिझनेस स्कूलकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीएसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी मार्चच्या अंतिम आठवडय़ापर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी:- सिंगापूरमधील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठ हे त्या देशातील एक प्रमुख विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा बिझनेस स्कूल हा विभागही आशिया व जगातल्या प्रमुख बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. नानयांग बिझनेस स्कूलकडून पदवी , पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम बहाल केले जातात. या तिन्ही पदवी स्तरांवरील विविध अभ्यासक्रमा

उच्चशिक्षणासाठी अर्थसंधी

के.सी. महिंद्र फाउंडेशनकडून के.सी. महिंद्र शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एमएस, एमए, एमबीए किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवलेल्या अर्जदारास ही शिष्यवृत्ती दिली जाते. उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. मूलभूत विज्ञान, कलाशाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- परदेशी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. यात मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी दिसतेय. पण परदेशात जाण्यासाठी पालकांना मोठे आर्थिक नियोजन करावे लागते. साहजिकच एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती किंवा तत्सम आर्थिक मदत मिळाल्यास ते पालकांना हवेच असते. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून के.सी.महिंद्र फाउंडेशनकडून