Posts

Showing posts from July, 2015

न्युझीलंडमध्ये पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती

  न्यूझीलंड शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून कोणत्याही विषयांतील  आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी संशोधन करता यावे यासाठी New Zealand International Doctoral Research Scholarships –NZIDRS हा पीएचडी कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय दि.१५ जुलै , २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत शिष्यवृत्तीबद्दल: विविध क्षेत्रांमधील जागतिक गुणवत्तेस आकर्षित करून त्या माध्यमातून न्युझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करायचा आणि त्यातून न्युझीलंडची अर्थव्यवस्था , आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना द्यायची या हेतूने न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय डॉक्टरल संशोधन शिष्यवृत्ती कार्यक्रम न्यूझीलंड शासनाच्या ‘ एज्यूकेशन न्यूझीलंड ’ कडून सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला त्याची ट्युशन फी भरता येईल. तसेच , त्याला मिळणारा एकूण वार्षिक भ