Posts

Showing posts from July, 2016

स्वित्झर्लंडमध्ये एमबीएसाठी शिष्यवृत्ती

व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांमधील जागतिक स्तरावरील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD) चे नाव घ्यावे लागेल. संस्थेच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी गुणवंत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१७ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमासहित शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीविषयी : –   व्यवस्थापन क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर असलेली संस्था म्हणजे स्वित्झर्लंडमधील   ‘ इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ’ (IMD).   २०१२ पासून ते २०१५ पर्यंत दरवर्षी   ‘ फायनान्शियल टाइम्स ’ ने संस्थेच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे असल्याचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्स ,   बिझनेस वीक ,   वॉल स्ट्रीट जर्नल इत्यादी संस्थांनीदेखील गेल्या काही वर्षांत आयएमडीला जगातल्या प्रथम क्रमांकाचे बिझनेस स्कूल म्हणून घोषित केलेले

सिंगापूरमध्ये दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती

सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व , पदवी व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक स्तरावरील शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या. पदवीपूर्व स्तरावरील शिष्यवृत्तीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना जीसीई-ए या पातळीच्या म्हणजेच ‘ सिंगापूर-केंब्रिज जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अ‍ॅडव्हान्स्ड ’ या किंवा तत्सम स्तरावरील दोन वर्षांचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. सिंगापूरच्या शैक्षणिक मंत्रालयाकडून दरवर्षी दहावी उत्तीर्ण भारतीय विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक अर्जदारांकडून १७ जुलै २०१६पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतरसांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व , पदवी व