Posts

Showing posts from October, 2016

कॅनडामध्ये करा पीएच.डी.

कॅनडा सरकारकडून व्हेनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कॅनडातील कोणत्याही विद्यापीठामध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदाराला तीन वर्षांसाठी ती मिळू शकते. मूलभूत विज्ञान, कला शाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील पीएच.डी.च्या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखिलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून दि. २ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. आवश्यक अर्हता: ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला कॅनडामधील कोणत्याही एका विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पीएच.डी. करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असावा

ब्रिटनमध्ये करा पीएचडी

कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी) या संस्थेकडून ब्रिटनमध्ये प्रत्येक विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम व पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ   इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांने सीएससीशी संलग्न विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी त्याला प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा सीएससीकडून दिल्या जातील , असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे ढोबळमानाने स्वरूप आहे. कोणत्याही विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१५ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल: - कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी)कडून राबवला जाणारा कॉमनवेल्थ स्कॉलरशिप अँड फेलोशिप प्लॅन (सीएसएफपी) हा जगातल्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. १९५९ साली सीएसएफपी कार्यक्रम चालू झाल्यापासून जवळपास पस्तीस हजार अर्जदारांना ही शिष्यवृत्ती बहाल करण्यात आलेली आहे. विविध विषयांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करण्याच्या हेतूने हा शिष्यवृत्