Posts

Showing posts from December, 2013

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये आता नाविन्यपूर्ण असे काही राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेली शैक्षणिक आदानप्रदान ही पूर्वी होत असलेल्या व्यावसायिक देवाणघेवाणीएवढी सहज व सोपी झालेली आहे. प्रत्येक देशामधून कितीतरी विद्यार्थी त्यांच्या उच्चशिक्षणासाठी परदेशात जात असतात. विद्यार्थ्याच्या संबंधित शैक्षणिकविषयातील परदेशातील अनेक शासकीय व खाजगी संस्थांनी पाठबळ दिल्याने उच्च शिक्षणासाठीहजारो शिष्यवृत्त्या देखील उपलब्ध असतात. सर्वोत्तम जागतिक बुद्धिमत्तेला आपल्याकडेआकर्षित करण्याच्या हेतूने तरी निदान अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संशोधनसंस्थां प्रचंड प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारचे आर्थिक पाठबळउपलब्ध करत असताना दिसतात. विद्यार्थ्यांना शिष्यावृत्त्यांशी निगडीत सर्व प्रकारच्या बाबींचेनिकष माहित असणे खूप आवश्यक आहे. सदराच्या आजच्या या लेखात अनेक पदव्युत्तरअभ्यासक्रमांसाठी (मास्टर्स) उपलब्ध असलेल्या विविध देशांमधील शिष्यवृत्त्यांविषयी. अमेरिकेत ग्लोबल हेल्थ स्कॉलरशिप:- आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये अभ्यास वा काम करणाऱ्या विद्यार्थ्या

जर्मनीत जीवशास्त्रामध्ये पीएचडीसाठी शिष्यवृत्ती

जर्मनीतील ‘मॅक्स प्लॅंक सोसायटीच्या 'द इंटर नशनल मॅक्स प्लॅंक रिसर्च स्कुल' IMPRS) या संशोधन संस्थे'ने तिथल्याच ’कोन्स्तान्त्झ विद्यापीठा’च्या सहकार्याने जीवशास्त्रातीलपीएचडीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यंना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेने याशिष्यवृत्तीसाठी पात्र पदव्युत्तर अर्जदारांकडून दि. १५ जानेवारी २०१४ पूर्वी अर्ज मागवलेआहेत. शिष्यवृत्तीबद्दल:- जर्मनीतील ‘मॅक्स प्लॅंक सोसायटीच्या 'द इंटर नशनल मॅक्स प्लॅंक रिसर्च स्कुल' (IMPRS)फॉर ऑर्गनायझमल बायोलॉजी ही संशोधन संस्था म्हणजे मॅक्स प्लॅंक सोसायटीच्याच ‘मॅक्सप्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर ओर्निथोलोजी' आणि 'कोन्स्तान्त्झ विद्यापीठाने एकत्र येऊनजीवशास्त्रातील संशोधनासाठी स्थापन केलेला एक छोटासा गट. मानवी उत्क्रांतीपासून तेमेंदूशी संबंधित शाखांप्रमाणे जीवशास्त्रातील इतरही अनेक शाखांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनव्हावे यासाठी ही संस्था २५ पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रीय संशोधन गटांबरोबर आव्हानात्मक वअतिशय उच्च दर्जाचे संशोधन घडवून आणते. ही शिष्यवृत्ती सप्टेंबर २०१४ मध्ये सुरुहोणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आहे. शिष

जर्मनीमध्ये विकसनशील देशांसाठी पाठ्यवृत्ती

हवामान संरक्षण व हवामानाशी संबंधित असलेल्या स्त्रोतांचे संवर्धन या विषयांवर जर्मनीच्या हम्बोल्ड्ट फाउंडेशन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून दरवर्षी साधारणतः वीस आंतरराष्ट्रीय अर्जदारांना पाठ्यवृत्ती दिली जाते. ही पाठ्यवृत्ती प्रामुख्याने विकसनशील देशांतील विविध विद्याशाखांमधील अर्जदारांसाठी असून ‘इंटरनॅशनल क्लायमेट प्रोटेक्शन फेलोशिप’ या नावाने ओळखली जाते. २०१४-१५ च्या पाठ्यवृत्तीसाठी पर्यावरण मंत्रालयाने दि. १५ मार्च २०१४ पूर्वी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पार्श्वभूमी:- सभोवतालच्या हवामानातील सततच्या बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर सर्व देशांच्या आपापसांतील सहकार्याने मात करता येऊ शकते, या विचाराने पर्यावरणाच्या या क्षेत्रात भावी नेतृत्व तयार व्हावे म्हणून हम्बोल्ड्ट फाउंडेशन व जर्मनी शासनाच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून हा पाठ्यवृत्ती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाने या पाठ्यवृत्ती कार्यक्रमामधून पाठ्यवृत्तीधारक व जर्मनीतील यजमान संस्था यांच्यामध्ये संशोधन विषयांतील ज्ञानाची तसेच संशोधनाशी संबंधित तंत्रज्ञान व कार्यप्रणाली यांची आदानप्रदान व्हावी असा व