पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'


उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यामध्ये आता नाविन्यपूर्ण असे काही राहिलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेली शैक्षणिक

आदानप्रदान ही पूर्वी होत असलेल्या व्यावसायिक देवाणघेवाणीएवढी सहज व सोपी झालेली आहे. प्रत्येक देशामधून कितीतरी विद्यार्थी त्यांच्या उच्चशिक्षणासाठी परदेशात जात असतात. विद्यार्थ्याच्या संबंधित शैक्षणिकविषयातील परदेशातील अनेक शासकीय व खाजगी संस्थांनी पाठबळ दिल्याने उच्च शिक्षणासाठीहजारो शिष्यवृत्त्या देखील उपलब्ध असतात. सर्वोत्तम जागतिक बुद्धिमत्तेला आपल्याकडेआकर्षित करण्याच्या हेतूने तरी निदान अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संशोधनसंस्थां प्रचंड प्रमाणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारचे आर्थिक पाठबळउपलब्ध करत असताना दिसतात. विद्यार्थ्यांना शिष्यावृत्त्यांशी निगडीत सर्व प्रकारच्या बाबींचेनिकष माहित असणे खूप आवश्यक आहे. सदराच्या आजच्या या लेखात अनेक पदव्युत्तरअभ्यासक्रमांसाठी (मास्टर्स) उपलब्ध असलेल्या विविध देशांमधील शिष्यवृत्त्यांविषयी.



अमेरिकेत ग्लोबल हेल्थ स्कॉलरशिप:-



आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये अभ्यास वा काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती म्हणजे एकखूप चांगली संधी आहे. अर्जदार पदवीधर असावा व त्याचा पदवीला असताना शोधनिबंधप्रकाशित झालेला असावा. हा शोधनिबंध जर एखाद्या विकसनशील देशातील जनतेच्याआरोग्याच्या बाबतीत असेल तर त्या अर्जदाराल प्राधान्य देण्यात येईल. या शिष्यवृत्तीस अर्जकरण्याची अंतिम मुदत दि. १० फेब्रुवारी २०१४ आहे.

महत्वाचा दुवा: http://www.globalhealth.pitt.edu/




गुगलकडून महिलांसाठी अनिता बोर्ग मेमोरियल शिष्यवृत्ती २०१४-१५

अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ डॉ. अनिता बोर्ग यांचे तंत्रज्ञानातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यास्मरणार्थ गुगलकडून दरवर्षी ही शिष्यवृत्ती माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञानक्षेत्रातील महिलांना दिली जाते. युरोप, मध्यपूर्व किंवा आफ्रिकेतील कोणत्याही विद्यापीठामध्येप्रवेश मिळालेल्या महिला उमेदवाराला या शिष्यवृत्तीस अर्ज करता येईल. अर्जदाराला दरवर्षीसुमारे ७००० युरो एवढे वार्षिक वेतन मिळेल. या शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.१७ फेब्रुवारी २०१४ आहे.

महत्वाचा दुवा: http://www.google.com/anitaborg/emea/index.html




स्कॉटलंड सरकारकडून उच्चशिक्षणासाठी युकेमध्ये साल्टायर शिष्यवृत्ती :-

स्कॉटलंड सरकारकडून दिली जाणारी साल्टायर शिष्यवृत्ती ही स्कॉटलंड या देशाला एक नवेयुरोपियन शैक्षणिक केंद्र म्हणून निर्माण करणे या हेतूने सुरु करण्यात आलेली आहे. हीशिष्यवृत्ती फक्त कॅनडा, चीन, भारत व अमेरिका या चार देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. याशिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी, पदव्युत्तर किंवा पी.एच.डी. ह्यापैकी कोणत्याही प्रकारच्या उच्चशिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तींची एकूणसंख्या २०० आहे. शिक्षणाच्या कालावधीदरम्यान स्कॉटीश सरकारकडून आवश्यक ट्युशन फी,निवासी भत्ता व विमा यांसारखी आर्थिक मदत केली जाणार आहे. साल्टायर शिष्यवृत्तीस अर्जकरण्याची अंतिम मुदत दि. ३० मे २०१४ आहे.

महत्वाचा दुवा: http://www.scotland.org/index.php/study-in-scotland/scholarships/saltire-scholarships

ऑस्ट्रेलियामध्ये कायद्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाकडून कायदा विषयातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तरअभ्यासक्रमासाठी ज्युरीज डॉक्टर शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत न्यूकॅसल विद्यापीठाच्या लॉं स्कुलकडून २०१४ मधील प्रवेशासाठी एकूण पाच शिष्यवृत्त्या देण्यातयेणार आहेत. शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०१४ आहे.

महत्वाचा दुवा: http://www.newcastle.edu.au/scholarships/BUSLAW_015

केएसपी एक्सलन्स पदव्युत्तर स्कॉलरशिप:-

Foundation for the Advancement of Sciences (KFAS) या संस्थेकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. मध्यपूर्व आशिया व अरब जगतातील घडामोडींचा अभ्यास केला जावा या हेतूने हि शिष्यवृत्ती देण्यात येते. सामाजिक विज्ञान व मानववंशशास्त्र या शाखेतील किंवा शाखेशी संबंधित विद्यार्थ्यांना अरब जगतातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षाचा असून दरवर्षी जवळपास १०००० युरोपर्यंत निधीचा समावेश असेल अशा अनेक शिष्यवृत्त्या संस्थेकडून देण्यात येतात.शिष्यवृत्तीस अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ४ फेब्रुवारी २०१४ आहे.

महत्वाचा दुवा: http://www.sciencespo.fr

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?