जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

जपानमधील टोकियोस्थित 'युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी(युएनयू)'मध्ये २०१३ च्या  पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या विद्यापीठात  Sustainability, Development and Peace या विषयांत एम. एस्सी.करण्यासाठी  जपानमधील जपान फाउंडेशनकडून विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दोन वर्षे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात 'जागतिक स्थिरता, सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन, वैश्विक शांतता निर्माण, विकास आणि मानवाधिकार' आदी आंतरशाखीय मुद्दे मुलभूत विज्ञान, सामाजिक विज्ञान कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत  पद्धतीने  करायचे आहेत. पदवीमध्ये फक्त सैद्धांतिक (Theory based) अभ्यासावर अवलंबून राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
प्रवेशासाठीचे निकष अर्जप्रक्रिया :-

वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच टोफेल अथवा IELTS  या परीक्षांत किमान गुण मिळवणे गरजेचे आहे. अर्जदारांनी संबंधित वेबसाईटवर (http://isp.unu.edu/) जाऊन हा अर्ज  भरायचा आहे. ही अर्जप्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ज्या अर्जदारांना शिष्यवृत्तीची गरज आहे त्यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०१३ आहे. तर इतर अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०१३ आहे. विद्यापीठाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती सहाय्यवृत्तींची (assistantships) संख्या मर्यादित आहे. विकसनशील देशांतील उच्चशिक्षित कुशाग्र शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या अर्जदारांना हे अर्थसहाय्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती अथवा  सहाय्यवृत्तीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाहीअर्जदाराला अर्जाबरोबरच दोन तज्ञांचे शिफारसपत्र विद्यापीठाला मेल करावे लागते. अर्थातच तज्ञांचा मेल आयडी आपल्याकडून घेवून विद्यापीठ त्यांना स्वतंत्रपणे संपर्क करते. या दोन तज्ञांपैकी एक अर्जदाराच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी संबंधित म्हणजेच त्याचे प्राध्यापक असावेत.


अभ्यासक्रम  अर्थसहाय्य :-

यूएनयूमधील उपरोक्त अभ्यासक्रम हा इंग्रजीत असून यासाठी जपानी भाषेवर प्रभुत्व असण्याची अजिबात गरज नाही. विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी आपला संशोधन प्रबंध विद्यापीठाला सदर करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांचे (युएन) विद्यापीठ असल्याने या पदवीचा अभ्यासक्रम साहजिकच भविष्यातील अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा वेध घेवून तयार केलेला आहे हे जाणवते. यूएनयूमधील या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ट्युशन फी दरवर्षी १०००० डॉलर्स म्हणजे सुमारे साडेपाच लाख रुपये आहे. अर्जदारांना जपान फाउंडेशन फॉर यूएनयूकडून (JFUNU) शिष्यवृत्ती सहाय्यवृत्तींचे अर्थसहाय्य दिले जातेशिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना  ट्युशन फी भरण्याची गरज नसते. म्हणजे त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीमधूनच ती भागवली जाते. याव्यतिरिक्त  या विद्यार्थ्यांना दरमहा दीड लाख येन म्हणजे साधारणत: एक लाख रुपयांएवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळते. त्यामध्ये टोकियोत राहण्या-खाण्याचा महिन्याचा खर्च आरामात भागतो.

महत्वाचे दुवे :-




वरील लेख (http://www.loksatta.com/career-vrutant-news/scholarship-of-diffrent-nations-37966/) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि. ७ जानेवारी २०१३ रोजी छापून आला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?