Posts

Showing posts from June, 2016

जर्मनीमध्ये कर्करोग संशोधनासाठी पाठ्यवृत्ती

Image
जगातल्या बव्हंशी लोकसंख्येवर होणारा कर्करोगाचा वाढता प्रभाव पाहता, एक गोष्ट त्वरित ध्यानात येते की कर्करोगाशी संबंधित होणारे मुलभूत संशोधन तुलनेने खूपच अपुरे आहे. हे संशोधन फक्त संख्यात्मकच नव्हे तर दर्जात्मक दृष्टीनेही वाढावे आणि त्यातून कर्करोगाच्या अचूक उपचाराच्या अभिनव पद्धतींचा विकास व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था मुळातच खूप कमी आहेत. जर्मनीतील ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे त्यापैकी एक प्रतिष्ठित संशोधन केंद्र आहे. कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता आकर्षित करता यावी व त्यातून या युवा संशोधकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे या हेतूने नुकतीच पीएचडी पूर्ण केलेल्या अर्जदारांसाठी पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्ती कार्यक्रम संस्थेकडून राबवला जातो. यावर्षीच्या या पाठ्यवृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून दि. ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीबद्दल: जर्मनीमधील हेडलबर्ग शहरात असलेले ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर (DKFZ)’ हे जर्मनीचे राष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्र आहे. दरवर्षी जर्मनीमध्ये साडेचार लाखांपेक्षाही जास्त लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. प्रत्येक

इटलीमध्ये आंतरविद्याशाखीय पीएचडी

इटलीमधील ‘ आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज ’ या संशोधन संस्थेने विविध विषयांची सांगड घालत आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील पीएचडी कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. पीएचडीसाठी प्रवेश , निशुल्क शिक्षण व एकूण तीन वर्षाच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१३ जुलै २०१६     पूर्वी अर्ज मागवले आहेत.   शिष्यवृत्तीबद्दल : २०१६ च्या युरोपमधील विद्यापीठांच्या रँकिंग्जनुसार मध्य इटलीमधील लुक्का या शहरात असलेली ‘ आयएमटी स्कूल फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज ’ ही संस्था संशोधनासाठी इटलीमध्ये प्रथम क्रमांकाची तर संपूर्ण युरोपात तृतीय क्रमांकाची म्हणून गणली गेलेली आहे. संस्थेच्या आद्याक्षरांतील आयएमटी म्हणजेच इन्स्टिट्यूशन्स , मार्केट्स , टेक्नोलॉजी. एकूणच संस्था शैक्षणिक-वैज्ञानिक , बाजारपेठ व तंत्रज्ञान या साऱ्यांचे एकत्रीकरण करू इच्छीत आहे व त्यातूनच विविध विषयांतील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करत आहे. म्हणूनच संस्थेने स्वत:च एक शैक्षण