Posts

Showing posts from January, 2017

मेरी डिग्री है जापानी!

जपानमधील केओ विद्यापी ठाकडून ‘ग्लोबल इन्फॉर्मेशन अँड गव्हर्नंन्स अॅकॅडमिक’ (GIGA) या कार्यक्रमांतर्गत प्रशासन कौशल्य,पर्यावरण अभ्यास आणि माहिती-तंत्रज्ञान या तिन्हींचा एकत्रित समावेश असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजेच  ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन एन्व्हायर्नमेंट अँड इन्फॉर्मेशन स्टडीज’ या पदवीचे शिक्षण घेऊ   इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्याला प्रवेश व प्रवेश शुल्कासहित इतर सर्व सोयीसुविधा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण असलेल्या अर्जदारांकडून या विद्यापी ठा ने  दि. १३ फेब्रुवारी २०१ ७ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल : - केओ विद्यापीठ हे जपानमधील सर्वात जुने विदयापीठ आहे. टोकियोतील मिनॅटो या उपनगरात वसलेल्या या विद्यापीठाची स्थापना १८५८ साली झालेली असून विद्यापीठात साहित्य , अर्थशास्त्र , कायदा , व्यवसाय आणि वाणिज्य , वैद्यकशास्त्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान , धोरण व्यवस्थापन , पर्यावरण आणि माहिती अभ्यास , नर्सिंग व फार्मसी या सर्व विद्याशाखांतील पदवी ते पीएचडी पर्यंतचे अभ्

डेन्मार्कमध्ये पीएचडीचे धडे गिरवा!

डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठाकडून कला विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ     इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांने विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी त्याला प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात ,   असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे ढोबळ स्वरूप आहे. कला शाखेतील कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या विद्यापीठाने २२ जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत. शिष्यवृत्तीबद्दल :- कोपेनहेगन विद्यापीठ हे डेन्मार्कमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना १४७९ मध्ये झालेली आहे. पीएचडीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही पन्नास हजारांच्या घरात जाते. विद्यापीठाचे एकूण चार कॅम्पस आहेत. यातील प्रमुख कॅम्पस कोपेनहेगन शहरात आहे. विद्यापीठाचे बहुतांश अभ्यासक्रम हे डॅनिश भाषेत शिकवले जात असून काही अभ्यासक्रम हे इंग्रजी व जर्मन भाषेतही उपलब्ध आहेत. कोपेनहेगन विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय