Posts

Showing posts from January, 2013

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

हॉंगकॉंगमधील हिनरीक  फाउंडेशनकडून दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित विषयांमध्ये पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पूर्णवेळ शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षीसुद्धा ह्या  फाउंडेशनकडू न आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या या विषयासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी :-   मर्ल हिनरीक  यांनी स्थापन केलेले हॉंगकॉंगमधील हिनरीक फाउंडेशन हे जागतिक व्यापाराला चालना देण्याचं काम त्यांच्या छोटयाशा पातळीवर करत आहे. हे काम करत असताना संस्थेनं आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित योजना, व्यापारासंबंधी शिक्षण-प्रशिक्षण व त्यातून रोजगार निर्माण इत्यादी विषयांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच, या साऱ्यातून राष्ट्रा-राष्ट्रांमधील शांतता वाढीस लागो, असा उदात्त हेतू समोर ठेवून हिनरीक फाउंडेशन प्रामाणिकपणे काम करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासारख्या व्यापक विषयाची आवड असणाऱ्या हुशार व ध्येयवादी भारतीय विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत असे संस्थेकडून आवाहन करण्

जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

जपानमधील   टोकियोस्थित  ' युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ( युएनयू )' मध्ये २०१३ च्या   पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . या विद्यापीठात   Sustainability, Development and Peace या विषयांत एम . एस्सी . करण्यासाठी   जपानमधील जपान फाउंडेशनकडून   विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे . दोन वर्षे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात ' जागतिक स्थिरता , सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन , वैश्विक शांतता निर्माण , विकास आणि मानवाधिकार ' आदी आंतरशाखीय मुद्दे मुलभूत विज्ञान , सामाजिक विज्ञान व कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत   पद्धतीने   करायचे आहेत . पदवीमध्ये फक्त सैद्धांतिक (Theory based) अभ्यासावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो . प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया :- वर उल्लेखलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही   मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी   उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याबरोबरच   टोफेल अथवा IELTS   या परीक्षांत किमान गुण   मि